23.3 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरऐ अल्लाह कोरोनापासून मुक्ती दे

ऐ अल्लाह कोरोनापासून मुक्ती दे

एकमत ऑनलाईन

लातूर : जगभरात थैमान घातलेल्या कोेरोना महामारीने ऐ अल्ला तुझ्या घराचे दरवाजेही बंद झाले आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या घरुनच तुझ्याकडे प्रार्थना करतो की, ऐ अल्लाह कोरोना महामारीपासून समस्त मानवजातीचे रक्षण कर, कोरोनापासून मुक्ती दे, अशी प्रार्थना ईद-उल-फित्रनिमित्त मुस्लिम बांधवांनी केली. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे कोणीच घराबाहेर पडले नाही. कोरोनाचे संकट असलाने दि. १४ मे रोजी दुस-याही वर्षी रमजान ईद अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.

गतवर्षी प्रमाणेच यंदाचाही संपूर्ण रमजानचा महिना कोरोनाच्या सावटाखाली गेला. रमजान सुरु होण्यापुर्वीपासूनच सर्व प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली होती. साहजिकच मस्जिदीही बंद राहिल्या. रमजना महिन्यात मुस्लिम बांधव ऐरवीपेक्षा जास्त नमाज, प्रार्थना, कुरआन शरिफचे पठण करीत असतात. त्यामुळे संपूर्ण महिनाभर मस्जिदांमधून गर्दी असते.. मात्र करोनोमुळे मुस्लिमांनी आपापल्या घरांनाच ईबादतगाह बनवले होते. पाचवेळेची नमाज, तरावीह, इतर प्रार्थना आपापल्या घरीच झाली. ईद-उल-फित्रची नमाजही घरोघरीच झाली. दरवर्षी सारखे माहोत यंदाही नव्हते. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी सकाळी आपापल्या घरी ईद-उल-फित्रच्या नमाजची तयारी केली आणि नमाज अदा केली. नमाज झाल्यानंतर मात्र प्रत्येकांनी अल्लाकडे एकच मागणी केली ती म्हणजे कोरोनापासून मानवाला मुक्ती दे.

रमजान ईद म्हणजे उत्साह, आनंदाचा मोठा सण, परंतु, गतवर्षी प्रमाणे यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे तो उत्साह, आनंद दिसलाच नाही. मुळात सर्वचजण संचारबंदी व लॉकडाऊनमुळे अडचणीत आले. आर्थिक अडचणीला सामोरे जात असताना वाढत्या महागाईचाही फटका बसला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनूसार बाजारपेठा उघडल्याअसली तरी ईदची खरेदी मात्र दरवर्षीप्रमाणे झाली नाही. ईदसाठी अगदीच आवश्यक साहित्यांची खरेदी आणि जुळवाजुळ करण्यात आली होती. लॉकडाऊन आणि संचारबंदी त्यात फिजिकल डिस्टन्स पाळणे आवश्यक असल्याने सर्वच गोष्टी मोजूनमापून झाल्या. त्यामुळे घरच्या घरी अत्यंत साधेपणाने ईद साजरी झाली. ईद असतानाही शहरात शुकशुकाट होता.

‘शिरखुर्मा’ची लज्जत यंदाही नाही
रमजान ईदचा एक रुबाब असतो. नवे कपडे, अत्तराचा सुगंध, सुरम्याची नजाकत, शिरखुर्माची लज्जत, एकमेकांच्या गळाभेटी आणि भरभरुन शुभेच्छांचा वर्षाव. परंतु, यंदा असे काहींच दिसले नाही. कोरोनाच्या सावटामुळे ना नवे कपडे ना अत्तर-सुरमा. बहुतेकांनी घरातील लहान मुलांनाच नवे कपडे घेतलेले. मोठ्या माणसांनी जुनेच कपडे परिधान करुन रजमान ईद अत्यंत साधेपणाने साजरी केली. महत्वाचे म्हणजे रमजान ईद ही हिंदू-मुस्लिम एैक्याचा एक वार्षिक उत्सवच असतो. मुस्लिम बांधव ईतर धर्मिय मित्र, परिवाराला आपल्या घरी अत्यंत अदबीने बोलावून ‘शिरखुर्मा’ पेश करतात. मात्र कोरोनामुळे यंदाही ‘शिरखुर्मा’ची लज्जत घेता आली नाही.

फिजिकल डिस्टन्स होते पण दुरावा नाही
यंदाची रमजान ईदही कोरोनाच्या सावटातच गेली. त्यामुळे मित्र, स्नेही, आप्तस्वकीयांना बोलावून त्यांची खातीरदारी करण्याची संधी यंदाही करोनामुळे मिळाली नाही. ‘शिरखुर्मा’चा अस्वाद घेत आला नाही की, गळाभेट. गळाभेटीने आपसातील स्नेह वाढतो. मात्र कोरोनाच्या निर्बंधामुळे फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे लागले. फिजिकल डिस्टन्स होते मात्र दुरावा अजिबात नव्हता. मित्रांनी, स्नेही जणांनी वॉटस्अ‍ॅप, फे सबुकच्या माध्यमातून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

कोरोना विषाणुलाही जगण्याचा अधिकार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या