22 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home लातूर ऐ अल्लाह, कोरोनापासून मुक्ती दे !

ऐ अल्लाह, कोरोनापासून मुक्ती दे !

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यामध्ये दि. १ ऑगस्ट रोजी बकरी ईद साजरी करण्यात आली. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता ईदनिमित्त कोणतीही शिथिलता प्रशासनाकडून देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे मस्जिद, ईदगाह, दर्गाह कुलूप बंद होते. मुस्लिम समाजाने रमजान ईदप्रमाणेच बकरी ईदचाही नमाज आपापल्या घरीच अदा केला. घरंच इबादतगाह झाली होती. ऐ अल्लाह, कोरोनापासून मुक्ती दे!, अशी प्रार्थना करण्यात आली.

सामान्य परिस्थितीत ईदची लगबग काही वेगळीच असते. सर्वत्र उत्साह आणि आनंदाला उधान आलेले असते. परंतु, यंदा कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे सर्वच चित्र बदलले. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यास अनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद, ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी आपापल्या घरीच अदा करावी, असे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात नमुद केले आहे. त्यानूसार लातूर शहर व जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरीच ईदचा नमाज अदा केला.

बकरी ईदनिमित्त शनिवारी सकाळी मुस्लिम बांधवांच्या घराघरातून एकच लगबग दिसून आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सर्वच व्यापार, उद्योग, व्यवसाय बंद असल्याने आर्थिक फटका सर्वांनाच बसला आहे. अशा परिस्थितीत ईद साजरी करणे तसे अवघडच. त्यामुळे प्राप्त परिस्थिती मुस्लिम बांधवांनी पारंपारीक पद्धतीने ईद साजरी केली. आपापल्या घरी शक्य ते गोडाधोड करुन त्यातच आनंद माणुन ईश्वराचे आभार मानले.

Read More  नीती आयोगाचा सल्ला : तीन मोठ्या सरकारी बँकांचे खाजगीकरण?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,406FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या