25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरजळकोट तालुक्यात ४ लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट

जळकोट तालुक्यात ४ लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट

एकमत ऑनलाईन

जळकोट: तालुक्यात ४३ ग्रामपंचायतीअंतर्गत शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत, मियावाकी वृक्ष लागवड, बिहार पॅटर्न, तसेच दूर ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जळकोट तालुक्यात सन २०२२-२३ साठी ४ लाख ७१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

जळकोट तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे तर बिहार पॅटर्न योजनेअंतर्गत मोठया ग्रामपंचायतींना २०००, लहान ग्रामपंचायतींना एक हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आली आहे,अशी माहिती गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार यांनी दिली. जळकोट तालुक्यातील ग्रामपंचायतींना सन २०२२ साठी शतकोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत वृक्ष लागवड करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यात अतनूर- ९८२३,तिरुका- ६८१०, बेळसांगवी- ३६२३, येवरी ३६५१, बोरगाव- २२०३, मरसांगवी-६८५९, चेरा- ८५६१, सुलाळी- ४३२५, धामणगाव- ५६३७, विराळ ३२३३ , मंगरूळ- ७८०८, एकुरका -३१५१, शिवाजीनगर तांडा- २३५२, गव्हाण ५३३८, रामपुरतांडा-३०८७, जगळपुर- ८१७१, घोणशी- ११३५८, लाळी खु- ३४६२, गुत्ती- ९२६९, रावणकोळा- ३३३०, हळदवाढवणा- ३०३२3, हावरगा ७३१४, येलदरा – २७०८, होकर्णा- ६५४२, वांजरवाडा- ११९१९, केकत शिंदगी- ५१४२, करंजी- ४४०८, पाटोदा बु- ८९४६, कोळनुर- ५२१६, पाटोदा खु- ३००७, कोनाळी डोगर- ३५४४, डोगरगाव- ३८२२, लाळी बु- २५९३, माळहिपरगा- ९७२६, मेवापूर – ३३५५, शेलदरा- ४०६०, वडगाव-१७५१, उमरगा- ५२६८, सोनवळा- ६९०५ , कुणकी- ७२६२’ या ग्रामपंचायत मध्ये लागवड होणार आहे .

जळकोट पंचायत समितीच्या वतीने वृक्ष लागवडीचेसर्व नियोजन करण्यात आले असून , मोठा पाऊस झाल्यानंतर ही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तालुक्यातील असलेल्या नर्सरी मधून रोपे खरेदी करण्यात येणार आहेत, अशी माहिती विस्तार अधिकारी दयानंद घंटेवाड यांनी दिली .

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या