23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeलातूर१७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यात एकाच वेळी ‘राष्ट्रगीत’ होणार

१७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यात एकाच वेळी ‘राष्ट्रगीत’ होणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवाचे आयोजन केले असून ८ ते १७ ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व स्तरातून दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शाळा, महाविद्यालय, संस्था, नागरिक यांच्या सहभागाने समुह राष्ट्रगीत म्हटलं जाणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणानी सर्वांपर्यंत ही माहिती पोहचवावी असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी सांगितले.

यासोबतच १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शन भरवायची असून त्यात स्वातंत्र्य काळातील घटना, त्याची माहिती त्यात अभिप्रेत आहे. दि. १५ ऑगस्ट रोजी झेंडा वंदन झाल्यानंतर सामूहिकरित्या तंबाखु मुक्तीची शपथ घ्यावयाची आहे. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सव-२०२२ च्या अनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागाची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) चे दत्तात्रय गिरी आदी विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या