24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeलातूरराखीपोर्णिमा ओवाळणीत भाऊ बहिणीला मोगरा रोप भेट देणार

राखीपोर्णिमा ओवाळणीत भाऊ बहिणीला मोगरा रोप भेट देणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
रक्षाबंधनाच्या सणाला ओवाळीणत भाऊ बहिणीला मोगरा रोप भेट देणार असून त्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमने पुढाकार घेतला आहे.
शहरातील जिजामाता विद्यालय व परिमल विद्यालय याठिकाणी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्व सांगून शाळेतील तीनशे मुलांना मोगरा फुलझाडांचे वाटप करण्यात आले. रक्षाबंधनाच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाच्या मनगटावर रक्षाकवच किंवा राखी बांधते. त्याच वेळी, भाऊ आपल्या बहिणीच्या सुरक्षा करण्याचे वचन देतो आणि भेटवस्तू देखील देतो. आज भावाने राखी बांधल्यानंतर बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देता म्हणून रक्षाबंधन निमित्ताने बहिणीला मोगरा फुलझाड देण्याचे आवाहन अ‍ॅड. वैशाली लोंढे यांनी केले.

या कृतीमुळे घराघरात झाडांची संख्या वाढेल, हरीत घर हां उपक्रम यशस्वी होईल, असे मत डॉ. पवन ंलड्डा यांनी व्यक्त केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, बाळासाहेब बावणे, अ‍ॅड. वैशाली लोंढे-यादव, दयाराम सुडे, दीपक नावाडे, मोईझ मिर्झा, आकाश सावंत, अभिषेक घाडगे, अरविंद फड, श्वेता यादव, नागसेन कांबळे, पूजा पाटील, रोहिणी पाटील, मुकेश लाटे, विजय मोहिते, विमल रेड्डी, सविता कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या