23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूररविवारी १२०० भाविक होणार पंढरपूरला रवाना

रविवारी १२०० भाविक होणार पंढरपूरला रवाना

एकमत ऑनलाईन

लातूर : माझं लातूर आणि ट्रॅव्हल्स व्यावसायिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत पंढरपूर वारी’ आषाढी एकादशीला दि१० जुलै रोजी सकाळी ६ वाजता नोंदणीकृत ११४७ भाविक प्रवाशी, ६० स्वयंसेवक, ३ रुग्णवाहिका आणि विक्रमी २२ ट्रॅव्हल्सने पंढरपूरकडे रवाना होतील. या प्रसंगी लातूर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा पोलीस अधीक्षक निखील ंिपगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्यासह परिवाराच्या मार्गदर्शिका डॉ.अर्चना पाटील चाकूरकर, ऍड. बळवंत जाधव, अभिजीत देशमुख, अरुण समुद्रे, डॉ. प्रमोद घुगे, डॉ. सदानंद कांबळे या उपक्रमास बिनशर्त सहकार्य करणारे सर्व ट्रॅव्हल्स व्यावसायिक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

नोंदणी केलेल्या सर्व ११४७ भाविक प्रवाशांनी सकाळी ठीक ६ वाजता अशोक हॉटेल येथील यशवंतराव चव्हाण संकुल येथे हजर राहावे, असे आवाहन माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. या सर्व भाविक प्रवाशांच्या सेवेसाठी ५० स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच ३ रुग्णवाहिका, २ डॉक्टर, ४ नर्सिंग स्टाफ अत्यावश्यक औषधांसह ताफ्यात राहणार आहेत. त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता सर्व भाविक प्रवाशांना घेऊन वारी परत लातूरकडे निघणार आहे. दरम्यान सहभागी सर्व भाविकांच्या चहापाणी, फराळ, मास्क आणि सॅनिटायझरची सोय मोफत करण्यात आली आहे. सर्व प्रवाशांनी वेळेवर उपस्थित राहावे, दिलेल्या सूचनांचे पालन करून स्वयंसेवकांना सहकार्य करावे, अशी विनंती माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जुगलकिशोर तोष्णीवाल, सोमनाथ मेदगे, जगदीश स्वामी, मदन केंद्रे, प्रविण पाटील, वाजीद शेख, नरेश घंटे, रवी अंबुज, सतीश तांदळे, काशिनाथ बळवंते, प्रा.डॉ. सितम सोनवणे, तम्मा पावले, प्रमोद गुडे, संजय स्वामी, अभय मिरजकर, ऍड. प्रदीप मोरे, गोपाळ झंवर, दिपरत्न निलंगेकर, ऍड. राहुल मातोळकर, अभिजित पिचारे परिश्रम घेत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या