21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरडॉक्टर्स डे निमित्त डॉ. गोपीकिशन भराडिया यांचा सत्कार

डॉक्टर्स डे निमित्त डॉ. गोपीकिशन भराडिया यांचा सत्कार

एकमत ऑनलाईन

लातूर : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉक्टर्स डे च्या निमित्ताने येथील विवेकानंद रुग्णालयातील डॉ. गोपीकिशन भराडिया यांचा नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी व सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्यच्या वतीने सत्कार करण्यात आला.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. नीलिमा देशपांडे यांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. हेमंतकुमार बोरसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, डॉ.हरदास, जिल्हा समन्वयक डॉ. बालाजी गोरे, डॉ. राधेशाम कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. भराडिया व डॉ. नीलिमा देशपांडे यांनी यावेळी मार्गदर्शनही केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या