22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरएक गट, दोन गण वाढले

एक गट, दोन गण वाढले

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकरिता प्रभागाच्या भौगोलिक सिमा निश्चित झाल्या आहेत. तालुक्यात पूर्वी १० गट व २० गण होते. या नविन प्रभागाच्या भौगोलिक सिमा निश्चितीत एक गट व दोन गण वाढल्याने यापुढे लातूर तालुक्यात ११ गट व २२ गणांची निवडणुकीकरिता निश्चिती करण्यात आली आहे.

राज्­य निवडणूक आयोगाच्या आदेशान्­वये दिलेल्­या कार्यक्रमांनुसार २०११ लोकसंख्येनुसार लातूर तालुक्यातील गण व गटांच्या निवडणुकांकरिता प्रभागाच्या भौगोलिक सिमा निश्चित केल्या आहेत. प्रारूप तयार करत असताना पूर्वीचे गटही कांही प्रमाणात बदलले आहेत. यात महापूर, बाभळगाव, पाखरसांगवी, काटगाव, मुरूड बु., निवळी, एकूर्गा हे जुने गट कायम राहिले असून भातांगळी, हरंगूळ बू., गाधवड हे गट वगळून नव्याने महाराणाप्रतानगर, आर्वी, चिंचोलीराव ब., तांदुळजा हे गट नव्याने वाढले आहेत.

तसेच गणाची रचना करत असताना कांही गण नव्याने तयार करण्यात आले आहेत. यात महापूर, भातांगळी, महाराणाप्रताप नगर, बोरी, बाभळगाव, गंगापूर, पाखरसांगवी, आर्वी, हरंगूळ, काटगाव, चिंचोली ब., वांजरखेडा, तांदुळजा, गाधवड, निवळी, गातेगाव, एकूर्गा, चिंचोलीराव वाडी हे गट कायम राहिले आहेत. तर मुरूडचे दोन तुकडे मुरूड ब १, व मुरूड ब २ असे करण्यात आले आहेत. तर दोन हरंगूळचे एक हरंगूळ करण्यात आले आहे. तसेच नव्याने कव्हा व नांदगाव हे गण तयार झाले आहेत. तर करकट्टा हा गण रद्द झाला आहे.

लातूर तालुक्यातील या प्रारुप प्रभाग रचनेवर काही हरकती व सूचना असल्­यास त्­या दि. ८ जून पर्यंत जिल्­हाधिकारी कार्यालय, लातूर येथे ग्रामपंचायत निवडणूक शाखेत सादर करता येणार आहेत. तसेच प्रारुप प्रभाग रचनेचे अवलोकन सर्व संबंधितानी करावे, असे आवाहनही जिल्­हाधिकारी लातूर यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या