32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeलातूरकोरोना केअर सेंटरसाठी शंभर स्वच्छता किट

कोरोना केअर सेंटरसाठी शंभर स्वच्छता किट

एकमत ऑनलाईन

चाकूर : येथील कोरोना केअर सेंटरमधील रुग्णांची अडचण लक्षात घेऊन बेलगाव (ता. चाकूर) येथील उपसरपंच तथा पत्रकार अशोकराव वाकळे पाटील यांच्या वतीने शंभर स्वच्छता किट देण्यात आल्या.

येथील कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. येथील सेंटरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातून अनेक रग्ण येतात त्यांच्याजवळ सकाळच्या स्वच्छतेसाठी साहित्य नसते यामुळे त्यांना अडचणी येत आहेत. हे लक्षात घेऊन रुग्णांना ब्रश, टुथपेस्ट, साबन, कपड्याचे साबन, तेल, कंगवा, फास्टकार्ड हे साहित्य ‘स्वच्छता किट’ च्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्तींनी द्यावे, असे आवाहन पत्रकार प्रशांत शेटे यांनी केले होते. यास प्रतिसाद देत पत्रकार अशोकराव वाकळे यांनी दहा हजार रूपये किमंतीच्या शंभर स्वच्छता किट दिल्या.

तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, पोलिस निरीक्षक जयवंतराव चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिपक लांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना पंडगे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदीवे यांच्याकडे हे स्वच्छता किट देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अशोकराव वाकळे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस संगमेश्वर जनगावे, जेष्ठ पत्रकार सुधाकर हेमनर, माधव वाघ, पत्रकार संघाचे सचिव सतीश गाडेकर, पत्रकार सुशिल वाघमारे, गणेश स्वामी, प्रशांत शेटे आदी उपस्थित होते. शंभर स्वच्छता किट दिल्याबद्दल तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी आभार मानले व समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येथून सहकार्य करावे असे आवाहन केले.

Read More  जिल्ह्यात १०४० कोरोना रुग्णावर उपचार सुरू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या