उदगीर : येथे उसने पैसे देण्याच्या कारणावरुन झालेल्या मारहाणीत एकाचा गंभीर जखमी होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना हेैबतपूर येथे घडली आहे. या यानंतर संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत काही जण जखमी झाले तर काही ठिकाणी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्याने उदगीर येथे काही काळ ताणावाचे वातावरण पसले आहे. पोलिसांनी पसिरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.
उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हैबतपुर येथे दि. १३ जानेवारी २०२१ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीस चौघांनी उसने घेतलेले पैसे परत कर, असे म्हणून जबर मारहाण केली. त्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. यासंदर्भात फिर्यादी फिरोज निजाम साब सय्यद यांनी रितसर तक्रारी दिल्यानंतर उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे येथे दि. १७ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी तानाजी फुले, राजकुमार बिरादार, महेश बिरादार, शांतवीर बिरादार यांच्याविरोधात रजिस्टर नंबर ४०/ २१ कलम ३०७, ५०४ , ३४ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरील गुन्ह्यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मात्र जखमीचा सकाळी मृत्यू झाल्याने उदगीर शहरातील अनेक तरुणांनी व नातेवाइकांनी मृतदेह पोलिस ठाण्यात आणून ठेवून आरोपींना तात्काळ अटक करा. अशी मागणी करून गोंधळ घातला.
दरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी तात्काळ उदगीर येथे येथे येऊन जमावाला दूर सारले. मात्र हा चिडलेला जमाव शहरात जाऊन दगडफेक करू लागल्याने शहरात तणावपूर्ण शांतता पसरली होती. या घटनेच्या अनुषंगाने उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. पोलिस प्रशासनाच्या हलगर्जीपणा बद्दल प्रश्न विचारला असता या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले. दुपारी तीन नंतर शहरातील दुकाने खुली झाली होती.
मयतांच्या नातेवाईकांचा पोलिसांवर रोष
या माथेफिरू जमावाने केलेल्या दगडफेकीत काही वाहनाच्या काचा फुटल्या असून काही लोकांना मारही लागलेला आहे.त्यांच्यावर उदगीर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयताच्या नातेवाईकांचा उदगीर ग्रामीण पोलिसावर रोष असून पोलिसांनी योग्य वेळी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली असती तर शहरात तणाव निर्माण झाला नसता. अशी चर्चा ठाण्यात सुरू होती.
अफवांवर विश्वास ठेवू नये: जाधव
अतिरिक्त पोलिस अधीक्षककिंमत जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, उदगीर शहरातील नागरिकांनी सामंजस्याने विचार करावा आणि कोणत्याही अफवा पसरवू नयेत. शहरातील तणाव आता पूर्णपणे निवळला असल्याने व्यवहार सुरळीत चालू ठेवावेत. असे आवाहन केले आहे.
यशस्वी वकील होण्यासाठी स्वयंशिस्तीची एबीसीडी आवश्यक