27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरएकरी एक हजार रुपयाप्रमाणे शंभर एकरच्या एक लाख बचत

एकरी एक हजार रुपयाप्रमाणे शंभर एकरच्या एक लाख बचत

एकमत ऑनलाईन

लातूर : पिकावरील किडीच्या नियंत्रणासाठी शंभर एकरवर निंबोळी अर्काची फवारणी करुन लातूर तालुक्यातील हरंगुळ खु. चे कृषि सहायक सूर्यकांत लोखंडे यांनी अनोखा उपक्रम राबवला आहे. यामुळे रासायनिक जंतूनाशक फवारणीचे होणारे दुष्परिणाम टाळून जैविक शेतीला प्राधान्य देत उत्पादन वाढीत समाधानकारक फरक जाणवणार असल्याचा त्यांनी विश्वास दिला आहे. निंबोळी अर्क तयार करुन फवारणी केल्याने एकरी एक हजार रुपयाप्रमाणे शंभर एकरचे एक लाख रुपयाची बचत झाली.

कृषि विभागाच्या वतीने निंबोळी जमा करण्याचे आवाहन केले होते. त्याला हरंगुळ खुर्द, नागझरी, रायवाडी व जेवळी येथील शेतक-यांनी प्रतिसाद देत सोयाबीनवरील किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्काचा वापर केला. सध्या सोयाबीनवर चक्रीभुंगा, खोडमाशी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे़ किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क फायदेशीर असल्याने निंबोळी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक कृषि सहायक सूर्यकांत लोखंडे यांनी दाखविले. यात पाच किलो निंबोळ्या घेऊन त्याची पावडर बनवावी. ही पावडर २४ तास ५ लिटर स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर पारदर्शी कापडातून गाळून घ्यावे. दुसºया पाच लिटर पाण्यामध्ये हे द्रावण चांगले मिसळावे यातच २०० ग्रॅम साबणाची निवळी मिसळावी आणि एकरी ८०० ते १००० मिली या प्रमाणात फवारणी करावी, असे सांगितले.

विविध किडींची प्रजनन शक्ती कमी होऊन किडींचे नियंत्रण करता येईल याशिवाय पिकांमध्ये कडवटपणा निर्माण झाल्याने पिके किडीपासून सुरक्षित राहतील, असे सांगितले. मोबाईलच्या माध्यमातून व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कृषि सहायक सूर्यकांत लोखंडे यांनी शेतकºयांना निंबोळी अर्क वापरण्याचे फायदे पटवून सांगितले. त्या माहितीच्या आधारे नागझरी येथील शिवराज स्वामी, माधव चव्हाण, दत्ता पवार, वीरभद्र स्वामी, महेश पवार, संतोष पवार, ज्ञानेश्वर पवार, रायवाडी येथील तुकाराम पवार, कृष्णात बरदापुरे, महेश मोहिते, अमोल मोहीते, रविंद्र मोहिते, महादेव पवार तर हरंगुळ खुर्द येथील महादेव बिडवे, शरद मसलकर, सुनील झुंजे, श्रीदेवी स्वामी, पार्वती होळकर, शरद पवार, रेवणप्पा झूंजे, मनोहर मुलगावे, मनोहर भुजबळ यांनी निंबोळी अर्काची सोयाबीनच्या कीड नियंत्रणासाठी फवारणी केली.

लॉकडाऊनच्या काळात कृषि सेवा केंद्र सुरू आहेत पण शेतकºयांना बाहेर पडता येत नव्हते, अशा काळात घरच्या घरी निंबोळी अर्क तयार करुन फवारणी केल्याने एकरी एक हजार रुपयाप्रमाणे शंभर एकरचे एक लाख रुपयाची बचत झाली़ शिवाय कीटकनाशकाचे आरोग्यावर होणारे दूष्परिणामापासून बचाव झाला. त्यामुळे शेतकºयांत समाधान दिसून आले. अशाच प्रकारे सर्व शेतक-यांनी निंबोळी अर्काचा वापर करुन खर्चात बचत करावी, असे आवाहन कृषि सहायक सूर्यकांत लोखंडे यांनी केले आहे.

Read More  छत्री घेऊन घरा बाहेर पडूया सुरक्षित अंतर ठेऊया

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या