लातूर : लातूर जिल्ह्यात एप्रिल २०२० पासून कोरोना विषाणुचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. या महिन्यात जिल्ह्यात १६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. मे महिन्यात ११९, जूनमध्ये २१४, जुलै महिन्यात १८५१, ऑगस्टमध्ये ५९११, सप्टेंबरमध्ये ९१८८ तर ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत १९७२ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. कोरोना संसर्गवर आळा घालण्यासाठी लातूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या वतीने एप्रिलपासून आजपर्यंत १ लाख ३ हजार ६६८ नागरिकांच्या कोविड चाचण्या करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी दिली.
संपूर्ण जगभर कोरोना विषाणुच्या संसर्गाने थैमान घातलेले असताना प्रारंभीचा काही काळ लातूर जिल्ह्यात सुप्तावस्थेत असलेल्या कोरोनाचा मीटर अचानक वेगाने धावााला सुररुवात झाली. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांची जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, जिल्ह्यातील सर्व उप जिल्हा रुगणलयांतील सर्वच्या सर्व यंत्रणा मोठ्या प्रमाणात कामाला लागली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली तरी यंत्रणेने उभारलेल्या व्यवस्थेमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्याची सोय झाली.
एप्रिल २०२० पासून आजपर्यंत संपूर्ण जिल्हाभरात एक लाख ३ हजार ६६८ अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १९ हजार २७१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. अॅक्टीव्ह रुग्ण संख्या १३५६ एवढी आहे. सौम्य लक्षणे असलेले रुग्ण १०१७, मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेले १३५ रुग्ण आहेत. आयसीयुमध्ये ८२, व्हेंटीलेटरवर १०, बायपॅप व्हेंटीलेटरवर ३२ तर ऑक्सिजन लावलेल्या रुणांची संख्या १६२ एवढी असल्याची माहिती डॉ. लक्षमण देशमुख यांनी दिली.
प्रश्नपत्रिकेसाठी विद्यार्थी ताटकळले साडे तीन तास