19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeलातूरआगामी हंगामासाठी दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

आगामी हंगामासाठी दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

एकमत ऑनलाईन

विलासनगर : प्रतिनिधी
शेतकरी सभासदांच्या जिवनात आर्थिक परिवर्तनासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२२-२३ चा ३६ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ दि. १० ऑक्टोबर रोजी माजी मंत्री तथा मांजरा परिवाराचे मार्गदर्शक चेअरमन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते पार पडला या गळीत हंगामात दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, रेणाचे माजी चेअरमन तथा संचालक यशवंतराव पाटील, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय देशमुख, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, संत शिरोमणी कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, व्हाईस चेअरमन शाम भोसले, विलास कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, संचालक अशोकराव काळे, तात्यासाहेब देशमुख, कैलास पाटील, सदाशिव कदम, बंकटराव कदम, वसंतराव उफाडे, ज्ञानेश्वर पवार, निळकंठ बचाटे (पवार), सचिन शिंदे, सुर्यकांत पाटील, धनराज दाताळ, नवनाथ काळे, अनिल दरकसे, शेरखाँ पठाण, शंकरराव बोळंगे, बाबुराव जाधव, तज्ञ संचालक महेंद्रनाथ भादेकर, ज्ञानेश्वर भिसे, कार्यलक्षी संचालक श्रीनिवास देशमुख, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, विशाल पाटील, विलास चामले, बाळासाहेब कदम, सचिन दाताळ, संभाजी सुळ, विरसेन भोसले, बाबासाहेब गायकवाड, सतिष पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, मागचा गळीत हंगाम हा प्रतिकुल परिस्थितीत परंतु यशस्वीपणे पार पाडला. या अनुषंगाने येणा-या हंगामासाठी सर्व नियोजन काटेकोरपणे करुन सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यांत आली आहे. शेतकरी सभासदांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास कायम ठेवत कार्य करत राहणे हेच खरे तत्व लातूरच्या सहकारी क्षेत्राचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आपल्या मनोगतात व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे यांनी गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी कारखान्यांने केलेल्या नियोजनाचा आढावा सादर केला व ऊस तोडणी जलद गतीने व्हावी यासाठी मोठया प्रमाणात लातूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून ऊस तोडणी यंत्र संबंधित शेतक-यांना उपलब्ध करुन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे म्हणाले की, कारखान्यास या गळीत हंगामात १०७५१ हेक्टर ऊस उपलब्ध असुन कारखाना आपल्या दैनंदिन गाळप क्षमतेचा पुर्ण वापर करुन तत्परतेने ऊस गाळप करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. मांजरा कारखान्याने गाळप क्षमतेचा विस्तार केला असल्यांने त्याचा खुप मोठा आधार ऊस गाळपासाठी होणार आहे. सहकार महर्षि दिलीपराव देशमुख, माजी मंत्री तथा कारखान्यांचे संचालक आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात व सर्वांच्या सहकार्याने हा गळीत हंगामदेखील यशस्वी केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी कारखान्याचे संचालक निळकंठ माणिकराव बचाटे (पवार) यांचे हस्ते सपत्नीक विधीवत पुजा करण्यांत आली. याप्रसंगी कारखान्यांचे खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन सचिन सुर्यवंशी व आभार प्रदर्शन कारखान्याचे संचालक कैलास पाटील यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या