16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeलातूरभू करमापक तथा लिपिक पदासाठी २८ नोव्हेंबरपासून ऑनलाईन परीक्षा

भू करमापक तथा लिपिक पदासाठी २८ नोव्हेंबरपासून ऑनलाईन परीक्षा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भू करमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्तपदे सरळसेवेने भरण्यासाठी ९ डिसेंबर २०२१ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदाची ऑनलाईन परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर होणार आहे.

या पदासाठी ९ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्यानंतर या अर्जदारांना २८ फेब्रुवारी २०२२ ते १३ मार्च २०२२ या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्राची तपासणी करण्यात आली. त्यानुसार भूमिअभिलेख विभगातील गट क पदाच्या सेवा प्रवेश नियामानुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हतेऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड केलेल्या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. संपूर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची सामान्य प्रशासन विभागाच्या ४ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे प्रवेशपत्राबाबतची लिंक https://mahabhumi.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. प्रवेशपत्रावर नमूद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी. या परीक्षा पध्दतीबाबतची सविस्तर माहितीपुस्तिका भूमि अभिलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी १४ नोव्हेंबरपासून लिंकदेखील विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे भूमि अभिलेख विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या