30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeलातूरऑनलाईन शिक्षण पध्दती पूर्णत: अयशस्वी

ऑनलाईन शिक्षण पध्दती पूर्णत: अयशस्वी

एकमत ऑनलाईन

जुक्टा संघटनेची बैठक विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करुन घेण्यात आले निर्णय

पोहरेगाव : रविवार सकाळी जिल्हा जुक्टा संघटनेची ऑनलाईन बैठक जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराम सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व जुक्टा संघटनेचे सचिव प्रा.बाळासाहेब बचाटे व कार्याध्यक्ष प्रा.संजय भंडारे यांच्या उपस्थितीत झाली. बैठक सुरू झाल्यानंतर प्रारंभी कै.आ.रामनाथ मोते, डॉ.सौदागर तसेच जुक्टा संघटनेच्या ज्या पदाधिकारी व सदस्यांच्या निकटवर्तीयांचे निधन झाले आहेत त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

ऑनलाईन क्लास घेण्यात अनेक तांत्रिक अडचणी आहेत, त्यामुळे हा प्रयोग अयशस्वी असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. आणि या ज्वलंत प्रश्नावर सांगोपांग चर्चा करण्यात आली. महासंघाच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या हक्कांसाठी काम करणारी,त्यांना त्यांचे अधिकार मिळावेत यासाठी धडपडणारी व कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे काम करणारी संघटना म्हणून जुक्टा (कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना) संघटनेकडे पाहिले जाते. वेळोवेळी शासन व प्रशासकीय स्तरावरुन घेण्यात येणार निर्णय अडचणीचे व अन्यायकारक असू शकतात या व अशा अनेक प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी जुक्टा संघटना काम करते.त्याचाच एक भाग म्हणून आज मिट अ‍ॅपद्वारे ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी लातूर जिल्हा जुक्टा संघटनेचे सचिव प्रा.बाळासाहेब बचाटे यांनी मागील बैठकीचे इतिवृत सादर करुन प्रास्ताविक केले. या बैठकीत जिल्ह्यातील सर्वच दहा तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी व सभासद सहभागी झाले होते.त्यामध्ये प्रा.संतोष हुडगे,प्रा.मारुती सूर्यवंशी, प्रा.एकनाथ पाटील, प्रा. डी. व्ही, राजे, प्रा. अनिल जाधव, प्रा. आर. पी. केंद्रे, महिला प्रतिनिधी अर्चना सूर्यवंशी,प्रा.राजेंद्र नागरगोजे, प्रा.अरुण महाळंकर, प्रा.लालासाहेब बोडके, प्रा.लहुकांत शेवाळे, प्रा.विनोद पुरी, प्रा.शिवराज मिटकरी, प्रा.राजकुमार हालकुडे,प्रा.चद्रकांत कदम, प्रा.संजय मुडपे, प्रा.गजानन पाटील,प्रा.सतीष उगीले, प्रा.देविदास माने आदींनी चर्चेत भाग घेऊन विविध प्रश्न मांडण्यात आले.

यामध्ये घोषित अघोषीत सर्व शाळांना विनाअट अनुदान द्यावे, उच्च माध्यमिकच्या प्रलंबित सर्व वाढीव पदाना अनुदान द्यावे २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वैद्यकीय प्रवेशासाठीचा ३०/७० चा फार्मुला त्वरित रद्द करावा, चालू वर्षात कोविड मुळे ११ वी प्रवेशाबाबत अडचणी निर्माण होत आहेत त्याबाबतीत संचमान्यतेत कोणी अतिरिक्त होणार नाही यासाठी शासनाला प्रवेशाबाबत अटी कमी करण्यासाठी निवेदन देणे, उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करावे,तसेच व्यवाहारिक हिंदी हा विषय संघटनेस व शिक्षकांना विश्वासात न घेता बंद केला आहे. त्यामुळे हिंदी विषयाचे शिक्षक अर्धवेळ किंवा अतिरिक्त होऊ शकतात म्हणून व्यवाहारिक हिंदी हा विषय पूर्ववत चालू ठेवावा,वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीबाबत जाचक अटी रद्द करुन ती पात्र शिक्षकांना सरसकट द्यावी, उपप्राचार्यपदास वेगळी श्रेणी द्यावी, सातव्या वेतन आयोगाचा फरक खात्यावर जमा करण्यात यावा अशा प्रकारच्या विविध मागण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी सर्व तालुका व जिल्हा पदाधिकारी यांनी मांडलेले प्रश्न जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी जुक्टा संघटना आग्रही असल्याचे व नजीकच्या काळात कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रश्नावर लढा उभारण्याचे आश्वासन जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराम सूर्यवंशी यांनी दिले. या बैठकीचे सूत्रसंचलन प्रा.राजेंद्र नागरगोजे यांनी केले, तर सर्व उपस्थितांचे आभार प्रा.संतोष हुडगे यांनी मांडले.

धक्कादायक व्हिडिओ : मुलगी उडाली आकाशी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या