22.7 C
Latur
Wednesday, August 12, 2020
Home लातूर श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचा ऑनलाईन सत्कार समारंभ

श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचा ऑनलाईन सत्कार समारंभ

एकमत ऑनलाईन

लातूर : येथील अभिनव मानव विकास संस्थाद्वारा संचलित श्रीकिशन सोमाणी विद्यालयाने नुकत्याच घोषित झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालात उल्लेखनीय कामगिरी केली असून विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच ऑनलाईन पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणांत पार पडला.

सोमाणी विद्यालयातील १२७ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. हे सर्वच विद्यार्थी गुणवत्तेसह उत्तीर्ण झाले असून विद्यालयातील १२७ पैकी ६८ विद्यार्थ्यांनी तब्बल ९० टक्क्यांहून अधिक गुण संपादन केले आहे आहेत. तर पाच विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संस्थेची अतिव इच्छा असूनहीविद्यार्थ्यांचे कौतुक करणे शक्य होऊ शकत नसल्याने या सर्व गुणवंतांचा गुणगौरव सोहळा ऑनलाईन पध्दतीने पार पडला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करुन भविष्यात अशाच प्रकारे उज्वल  यश संपादन करून ज्या क्षेत्रात जातील त्या क्षेत्रात अव्वल राहण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. सचिव कमलकिशोर अग्रवाल, संस्थेचे मार्गदर्शक अतुल देऊळगांवकर, कोषाध्यक्ष जयेश बजाज यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन यापुढेही अशाच प्रकारचे यश मिळवा ,अशा सदिच्छा दिल्या. या ऑनलाईन गुणगौरव सोहळ्यात विद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी कुलश्री काळे, आदिती शिंदे, ऐश्वर्या साखरे, अमेय प्रयाग, दुर्वेश खंडेलवाल, सायली दावणकर, प्रांजली पटणे स्रेहा पांचाळ या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीने दावणकर , पटणे व सौ. काळे यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी सहशिक्षक धनु काळे, सहशिक्षक उत्तरा शहरकर यांनीही अभिनंदनपर विचार व्यक्त केले. मुख्याध्यापक रमाकांत स्वामी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती एस. एस. भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी यांनी केले.

Read More  राजस्थानमधील तमाशा मोदींनी बंद करावा- अशोक गेहलोत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,143FansLike
101FollowersFollow