32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeलातूर‘केशवराज’मध्ये ऑनलाईन क्रांतीदिन कार्यक्रम

‘केशवराज’मध्ये ऑनलाईन क्रांतीदिन कार्यक्रम

एकमत ऑनलाईन

लातूर : ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त येथील श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात ऑनलाईन क्रांतीदिन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

या निमित्ताने वर्गश: क्रांतीकारकांची माहिती देण्यात आली. ७ वी अ या वर्गातील विद्यार्थ्यांना चतूर, शूर आणि थोर कर्तृत्व आणि नेतृत्व असणा-या थोर क्रांतीकारक राणी लक्ष्मीबाई यांनी वैधव्य प्राप्त झालेलं असूनही आत्मविश्वासाने स्वकर्तृत्वाने, चातुर्याने, पराक्रमाने, स्वराज्यासाठी इंग्रजांशी लढा दिला, अशी माहिती कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूण्या निता कानडे यांनी सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र बारस्कर यांनी मूलींना क्रांती म्हणजे विविध क्षेत्रातील चांगला बदल, हा बदल आपण जीवनात घडवून आणला पाहिजे, असे सांगितले. तसेच ऑनलाईन क्रांतीदिन खूप चांगला साजरा केला याबद्दल शाळा व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यावेळी मीरा चामवाड व ७ वी अ मधील विद्यार्थ्यी उपस्थित होते. प्रांजली मांडे या स्वगत सादर केले. सृष्टी लोखंडे हिने गीत सादर केले. रामेश्वरी दिवाण याने सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक राधाराणी कदम हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंजूळदास गवते, सुनील वसमतकर, दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शांतीमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

सीमावर्ती भागात अजूनही शिक्षक तैनात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या