शिरूर अनंतपाळ : तालुक्यात नेटवर्क अभावी संपूर्ण ऑनलाईन प्रणाली बंद पडलीली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बीएसएनलची लाईन कट होत असल्याने नेटवर्क सेवा सतत खंडीत होत आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासह कार्यालयीन कामे खोळंबली असून पुरेसे नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांमध्येच तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा पूर्ण पणे विस्कळीत झाली असून कधी नेटवर्क राहील की जाईल असा प्रकार पाहायला मिळत आहे. शासकीय कार्यालयासह बँका व इतर इंटरनेटवर चालणारे शासकीय व अशासकीय कार्यालयातील कामे ठप्प झाली आहे. नेटवर्कच्या सततच्या येण्या जाण्यामुळे कर्मचारी परेशान झाले असून अनेक कार्यालयात डोंगलच्या साह्याने कर्मचारी काम करीत आहेत. सध्या सर्व ऑफीस पेपरलेस झाले असून सर्व कामे ऑनलाईन झाली आहेत. त्यासाठी बीएसएनएल च्या ब्रॉडबँड सेवेचा प्रामुख्याने वापर केला जातो.त्यात बँका,शासकीय कार्यालये सेतू सुविधा केंद्र, महाऑनलाईन केंद्र, तालुकाभरातील विविध बँकाच्या मिनी शाखा येथे बीएसएनएलची ब्रॉडबँड सेवा आहे.
अशात गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाल्याने शासकीय ऑनलाईन कामे ठप्प झाली तर ऑनलाईन शिक्षण ही बंद झाले आहे. त्याचा कार्यालयालयीन ऑनलाईन कामकाजावर परिणाम झाला आहे. काही कार्यालयाच्या ठिकाणी नेटसेटरच्या (डोंगल) माध्यमातून खाजगी कंपनीची सेवा घेऊन काम करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे पंरतु त्यास अपेक्षित वेग नसल्याने कामकाज सुरळीत होत नाही. त्यामुळे बीएसएनएलची अखंडीत सेवा द्यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.
सध्या अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने या कामात बीएसएनएलची लाईन कट होत आहे. परिणामी नेटवर्क कनेक्टीव्हीटी बंद पडत आहे. त्यासाठी बीएसएनएलचे कर्मचारी व अधिकारी ब्रॉडबँड सेवा पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बीएसएनल अभियंता बी.आर.टोंपे यांनी सांगितले.
नांदेडमध्ये ७२२ पोलिस कर्मचा-यांच्या बदल्या