26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूर२७ दिवसांत जिल्ह्यात फक्त एक पॉझिटिव्ह

२७ दिवसांत जिल्ह्यात फक्त एक पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील कोरोना आता ब-यापैकी ओसरत आहे. एप्रिलच्या गेल्या २७ दिवसांत जिल्ह्यात फक्त एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्याचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग एव्हरेज १८ असून एप्रिल महिन्याच्या गेल्या २७ दिवसांत २५५१ रॅपिड अ‍ॅटिजेन, १२८८ आरटीपीसीआर असे एकुण ३८३९ चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये दि. १४ एप्रिल रोजी केवळ एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्याची कोरोनामुक्तेकडे वाटचाल सुरु असल्याचे सांगण्यात येते.

लातूर जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट २६ एप्रिल २०२० ते २८ फे बु्रवारी २०२१ या कालावधीत राहिली. कोरोनाची ही पहिली लाट लातूर जिल्ह्यासाठी अगदी नवखी होती. कोरोनाची लक्षणे, त्यावरील उपचार याबाबत कोणाला फारसे काहींच माहित नव्हेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानूसार केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली कोरोना रुग्णांवर उपचार केले गेले. पहिल्या लाटेत लातूर जिल्ह्यात २ लाख २९ हजार ६३८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. पहिल्या लाटेचा पॉझिटिव्हीटी रेट १०.८२ एवढा होता. ७०५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर मृत्यू दर २.८ होता. कोरोनाची दुसरी लाट १ मार्च २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालवधीत राहिली. दुस-या लाटेत ६ लाख ६४ हजार १५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण लातूर जिल्ह्यात आढळून आले. या लाटेल १ हजार ७४६ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू दर २.६ होता.

लातूर जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट १ जानेवारी २०२२ पासून सुरु झाली. या लाटेत १ लाख १ हजार २९६ कोरोनाबाधित आढळून आले. ३५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. मृत्यू दर ०.३ एवढा राहिला. तिस-या लाटेत पॉझिटिव्हिटी रेट १२.७४ एवढा असला तरी मृत्यू दर मात्र घसरलेला होतो. त्यामुळे पहिल्या व दुस-या लाटेच्या तुलनेत तिस-या लाटेत मृत्यूचे प्रमाण कमी दिसून येते. कोरोनाच्या तीन्ही लाटेत लातूर जिल्ह्यात एकुण २ हजार ४८६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या