लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार मतदान होणार असुन भारत निवडणुक आयोगाने मत नोंदविण्यासाठी मतदांना आवश्यक सुचना जारी केल्या आहेत. मतदान करण्यासाठी केवळ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळ्या रंगाचा स्केचपेन वापरावा. याशिवाय तुमची मतपत्रिका अवैध ठरेल. इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन किंवा इतर चिन्हांकित करावयाची साधने वापरु नयेत.
पसंतीक्रम या स्तंभामध्ये, ज्यास तुम्ही पहिला पसंतीक्रम देण्यासाठी निवडले आहे, त्या उमेदवाराच्या नावासमोर ‘१’ अंक नमूद करुन त्यास मतदान करता येईल. हा अंक केवळ एका उमेदवाराच्या नावासमोर नमूद करता येईल.जरी निवडून यावयाच्या उमेदवारांची संख्या एका पेक्षा जास्त असेल तरी ‘१’ हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद करता येईल. निवडून द्यावयाच्या उमेदवारांच्या संख्येव्यतिरिक्त तुम्हाला जेवढे उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तेवढे पसंतीक्रम नोंदविता येतील. उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर तुमचा पुढील पसंतीक्रम २, ३, ४ इत्यादी अंक तुमच्या पसंतीक्रमानुसार पसंतीक्रम या स्तंभामध्ये दर्शविता येईल. कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद केला जाईल याची खात्री करावी आणि एकसमान अंक एका पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावा समोर नमुद केले नसल्याची सुद्धा खात्री करावी.
पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल. उदा. १, २, ३ इत्यादी आणि तो एक, दोन, तीन, इत्यादी असा शब्दात दर्शविलेला नसावा. पसंतीक्रम स्तंभामधील अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरुपात जसे १, २, ३ इत्यादी किंवा रोमन स्वरुपातील इत्यादी किंवा देवनागरी स्वरुपातील १, २, ३ किंवा संविधानाच्या ८ व्या अनुसुचितील भारतीय भाषेतील अंकाच्या स्वरुपात नोंदविला जाईल. मतपत्रिकेवर तुमचे नाव किंवा कोणतेही शब्द, आणि तुमची स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे नमूद करु नयेत. तसेच अंगठ्याचा ठसा सुध्दा उमटवू नये, यामुळे तुमची मतपत्रिका अवैध ठरेल.
तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर केवळ किंवा ‘एक्स’ असे नमूद करणे पुरेसे नाही, अशी मतपत्रिका बाद ठरु शकते. आपला पसंतीक्रम केवळ अंकात १,२,३, इत्यादी वर विषद केल्याप्रमाणे नमूद करावा. तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी उमेदवारांपैकी एकाच्या नावासमोर ‘१’ हा अंक तुम्ही दर्शविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम हे ऐच्छिक स्वरुपाचे आहेत. दुसरा आणि त्यापुढील पसंतीक्रम दर्शविणेकिंया न दर्शविणे ही बाब तुमच्यासाठी ऐच्छिक आहे.
या कारणामुळे आपले मत अवैध ठरु शकतात
अंक ‘१’ नमूद नसल्यास. एका पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर ‘१’ हा अंक नमूद केलेला असल्यास. ‘१’ हा अंक अशा रितीने नमूद केला आहे का, तो कोणत्या उमेदवारा करिता दिला याबाबत संदिग्धता आहे. ‘१’ हा अंक आणि इतर अंक जसे की, २, ३ इत्यादी एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद केलेले असल्यास. पसंतीक्रम अंकाऐवजी शब्दात नमूद केल्यास. मतदाराची ओळख पटेल असे कोणतेही चिन्ह किंवा लिखान मतपत्रिकेवर नमूद असल्यास. निवडणूक निर्णय अधिका-याने पसंतीक्रम नमूद करण्यासाठी दिलेल्या जांभळ्या स्केच पेन, शिवाय इतर वस्तुने कोणताही अंक नमूद केलेला असल्यास वरील कारणांनी अवैध ठरविण्यात येईल.
बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर