22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeलातूरभंडारवाडी प्रकल्पात दहा टक्केच पाणीसाठा

भंडारवाडी प्रकल्पात दहा टक्केच पाणीसाठा

एकमत ऑनलाईन

रेणापूर : पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले व मोठे पावसाचे समजले जाणारे मघा नक्षत्र सुरू झाले असले तरी प्रकल्प पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न झाल्याने तालुक्यातील निम्या गावांची तहान भागवणा-या भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात ऐन पावसाळ्यात घट होत चालली आहे. सध्या प्रकल्पात केवळ साडेदहा टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्यानेचिंता व्यक्त केली जात.

रेणापूर तालुक्यात व्हटी व रेणा मध्यम हे दोन प्रकल्प मोठे आहेत . रेणा मध्यम प्रकल्पावर रेणापूर दहा खेडी , पानगाव बारा खेडी , कामखेडा पाच खेडी ,पट्टीवडगाव, खरोळा या गावांच्या नळयोजनां अवलांबुन आहेत . गत वर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत प्रकल्प कोरडे होते . त्यामुळे या पाण्याचे मोठे दुर्भीक्ष जाणवणार अशी भिती व्यक्त केली जात असतानांच अचानक गतवर्षी ऑक्टोबर -नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी व परतीच्या पावसाने दिलासा दिला. एका आठवड्यातच रेणा मध्यम प्रकल्पात ९ .८३१ दश लक्ष घन मिटर म्हणजेच ४७ .८३ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा झाला होता .तर गत मे महिन्यात रेणा मध्यम प्रकल्पात १४ टक्के पाणी साठा शिल्लक राहिला.

दरम्यान या वर्षी रेणापूर तालुक्यात जुन मृग नक्षत्रात पाऊसास प्रारंभ झाला पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतक-यांनी खारीपाच्या पेरण्या केल्या सध्या तालुक्यात पिकांसाठी पोषक असा पाऊस होत असल्याने पिके बहरली आहेत मात्र गत अडीच महिन्यत दमदार , मोठा पाऊस न झाल्याने आजही नदी ,नाले ,ओढे वाहिली नसून कोरडे आहेत . तसेच निम्या तालुक्याची तहान भागवणा-या रेणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात ही मोठा दमदार पाऊस न झाल्याने कसलाही पाणी साठा झाला नाही उलट मे महिन्या असलेल्या १४ टक्के पाणीसाठ्यातून साडेतीन टक्केपाण्याची घट झाली आहे.

सध्या रेणा प्रकल्पात साडेदहा टक्के इतकापाणीसाठा उपलब्ध असून नागरिकांतूनचिंंता व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या रेणा मध्यम प्रकल्प पाणी साठा होण्यासाठी दमदार पावसाची गरज असून १ महिना पावसाळा शिल्लक असला तरी या काळात मोठा पाऊस झाल तरच प्रकल्पात पाणी साठा होणार आहे. मोठा पाऊस होऊन रेणा प्रकल्प, नदी, नाले तुुडुंब भरावे, असे साकडे नागरीकातून इश्वराकडे घातले जात आहे.

शहिद डॉ. दाभोलकरांना कृतिशील आदरांजली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या