24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरसामाजिक असंतोषावर साहित्यिकांनीच करावा इलाज

सामाजिक असंतोषावर साहित्यिकांनीच करावा इलाज

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
समाजात धार्मिक, जातीय तेढ निर्माण करण्याचे स्तोम वाढत आहे. अशा असंतोषाच्या वातावरणात शब्दपंढरी प्रतिष्ठान व इदारा अदब -ए- इस्लामी हिंद लातूरच्या संयुक्त विद्यमाने भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात ईद मिलन व कविसंमेलन आयोजित करून त्या माध्यमातून सामाजिक एकोप्याचा संदेश दिला आहे. सामाजिक असंतोषावर साहित्यिकांनीच इलाज करावा, असे आवाहन ज्येष्ट कवी अ‍ॅड. अजय पांडे यांनी केले.

अध्यक्षस्थानी बज्म-ए-अदबचे अध्यक्ष तथा बहुभाषिक कवि अजय पांडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अदब ए इस्लामी हिंदचे अध्यक्ष मकबूल अहेमद मकबूल, जमाअत-ए-इस्लामी हिंदचे राज्य अध्यक्ष डॉ. असद पठाण यांची उपस्थिती होती. हिंदी, उर्दू व मराठीचे संयुक्त कविसंमेलन ही बाब विशेष आहे. सामाजिक परिस्थिती अनेक दिवसांपासून कलुषित होत आहे. अशात एक दुस-यास समजून घेणे गरजेचे आहे. कवि, लेखक, साहित्यिक मानवतेचा संदेश देत असतात, असे मत मकबूल अहेमद यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडले. तर डॉ. असद पठाण म्हणाले, अरबी भाषेतील सर्वश्रेष्ठ साहित्य म्हणजे कुरान आहे. आदर्श चरित्र, माणुसकी बाळगारा माणूस महत्वाचा आहे. विज्ञानाबरोबरच अध्यात्मिक ज्ञानाकडेही बघायला हवे. धर्माचे उथळ ज्ञान असणारे समाजात धार्मिक तेढ निर्माण करतात, सखोल ज्ञान असणारे समता, शांती प्रस्थापित करतात. कवि नामदेव कोद्र यांच्या यार हो या कवितेने कविसंमेलनाची सुरुवात झाली.

चर्च झालो, मशीद झालो,
यार हो विहार झालो मी
कधीच कुणासाठी नुसते
मंदिर झालो नाही मी…
त्यांनी या कवितेतून धर्मनिरपेक्षता मांडली. त्यानंतर नयन राजमाने यांनी श्रमाला प्रतिष्ठा देणारा अभंग सादर केला. विशाल अंधारे यांनी मछली ही कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. बिभिषण गिरी यांनी स्त्री अत्याचारावरील मी लिहितोय तिला ही कविता सादर केली. प्रमोद जाधव या कविने,
कर्तत्व माणसाचे जातीत वाटले का,
मी रामनाम जपतो करतो सलाम आता
ही आशयगर्भ कविता सादर करून श्रोत्यांचा हृदयाला हात घातला. अतिथी कवि डॉ. संतोष कुलकर्णी यांनी
अब साये का सायेसे रिश्ता होगा
सरकारे बनती है गिरती है पल में
बाजारो में हर कोई बिकता होगा
ही गझल सादर करून आजच्या राजकीय परिस्थितीचा आरशा दाखवला. प्रा. दुष्यंत कटारे यांनी संविधान या कवितेतून म्हणाले,
माणसाच्या -हदयातून वाहिला
पाहिजे माणुसकीचा झरा
आम्ही भारताचे लोक हाच
असला पाहिजे आपला नारा

डॉ. असफाक पटेल यांनी आपल्या अटळ कवितेतून सामाजिक धग श्रोत्यांसमोर मांडली. या शिवाय विमल मुदाळे, शामल गोरे, दिलीप लोभे, नरंिसग इंगळे, महेश पेंउपाळे, ब्रम्हदेव खिल्लारे, अब्दुल गालिब शेख, विजया बनगे, जना घुले, फ. म. शहाजिंदे, सुरेश गीर, संजय जमदाडे, रामदास कांबळे, वंदना केंद्रे, सय्यद तेहसीन, हाफिज इम्रान, महमद मुसब, सय्यद पाशा रहेबर, मुबीज हकिबसाब, जहिरुद्दीन जोश, मौलाना जैनूल अबेद, सय्यद अकिल,डॉ. मकबूल अहेमद, हर्षदा जोशी, आकांक्षा आळणे, सुशीला पवार, डॉ.विना घुमे, अ‍ॅड. हाशम पटेल, प्रा. दयानंद बिराजदार, सुरेद्र स्वामी, राजकुमार लोखंडे, बाळासाहेब मगर, शिवाजी नामपल्ले, विकास क्षीरसागर, राजेंद्र माळी, छगन घोडके, दिलीप गायकवाड, महेश काकनाळे, मधुकर हुजरे, मल्हारी गायकवाड, विक्रांत शंके आदी कंिवनी आपल्या सामाजिक, विद्रोही, प्रेम, राजकारण आदी विषयांवरील कविता सादर केल्या. या कवि संमेलनाचे सूत्रसंचलन प्रख्यात कवि योगीराज माने, अब्दुल गालिब व हाफिज इम्रान यांनी बहारदारपणे केले. शेवटी शिरखुर्माने कविसंमेलनाची गोड सांगता झाली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या