उदगीर : महाराष्ट्र शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुटखा विक्रीला कायम बंदी असूनही विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश संबंधित विभागाला दिल्यानंतरही तालुक्यात व शहरामध्ये सर्वत्र गुटखा तस्करांनी चांगलाच जम बसविल्याचे दिसून येत आहे.शहरात खुले आम गुटका विक्री सुरू आहे.
गुटखा तस्कर हे शेजारच्या कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटका आणून उदगीर शहराच्या मध्यभागी साठविला जात असल्याचेही बोलले जाते नंतर हा गुटखा पुन्हा शहरातील बसस्थानक परिसर, चौबारा रोड, उमा चौक,चौक शिवाजी चौक, देगलूर रोड या परिसरात गुटख्याची खुलेआम विक्री करतात. उदगीर शहरांमध्ये हा गुटखा रातोरात पुरवठा केला जातो. गुटका कोणत्या गाडीत येतो किती वाजता येतो. ही सर्व माहिती संबंधित पोलिस कर्मचा-यांनाही माहीत असते तरीदेखील पोलीसवाले त्या गुटखा तस्करवाल्यांना पकडू शकत नाहीत. यात मोठ्या प्रमाणावर अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याची चर्चा सुरू आहे.
शहरातील एखाद्या ठिकाणी जाऊन कायदेशीर कार्यवाहीचे नाटक केल्यानंतर पुन्हा गुटख्याची जोमाने शहरातील अनेक ठिकाणी खुलेआम विक्री केली जाते. याला कायम प्रतिबंध करण्यासाठी उदगीर शहरातील प्रशासकीय यंत्रणा केव्हा कारवाई करणार असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे. अत्यंत घातक असलेल्या गुटख्याची विक्री खुलेआम सुरु असतानाही कोणताही संबंधित अधिकारी ही गुटखा तस्करी बंद करण्यासाठी पुढाकार घेत नाहीे. उदगीर शहरातील अनेक भागात गुटख्याची ने-आण करणारी वाहने दिवसभर फिरत असतात. यातून दररोज लाखो रुपयांचे उलाढाल होत असल्याचे बोलताना दिसून येते.
महिला व बालकांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची ‘शक्ती’ विधेयकाला मंजुरी !