23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरनेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांचे लातूरात नेत्र तपासणी शिबीर

नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांचे लातूरात नेत्र तपासणी शिबीर

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रउपचारासाठी प्रसिध्द असलेल्या अहमदनगरच्या साई सूर्य नेत्रसेवा लेसर प्रणालीवर आधारीत सर्वात आधुनिक ‘काँटयुरा व्हिजन’ तंत्रज्ञान उपलब्ध झाले असून या तंत्रज्ञानामुळे केवळ चष्म्याचा नंबर कायमचा जात नाही तरी चष्म्यापेक्षाही चांगली दृष्टी मिळवणे आता शक्य झाले आहे. डॉ. कांकरिया यांचे ‘चष्मा नको’ असणा-यांसाठी भव्य नेत्र तपासणी व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबीर रविवार, दि. १९ जून २०२२ रोजी, सकाळी १० ते १२, हॉटेल पार्थ लातूर येथे आयोजित केले आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे अतिशय लहानपणी दृष्टीदोष व मोठे चष्म्याचे नंबर लागण्याचे प्रमाण मोठ्या गतीने वाढत असून हा एक मोठा चिंतेचा विषय झाला आहे. पूर्वी संपूर्ण शाळेत ४-५ जणांवर चष्मा असायचा त्यांना कंदील म्हणून चिडवायचे आता प्रत्येक वर्गात १०-१५ कंदील झाले आहेत. या पुढील आयुष्यात सैन्यात जाणे, पोलिस भरती, पायलट होणे, नेव्ही, एम. पी. एस. सी, यु. पी. एस. सी स्पर्धा परिक्षा, रेल्वे व अनेक जॉबसाठी नकार दिला जातो. त्याचप्रमाणे अभिनय करणे, मॉडेंिलग, चित्रपट व दूरदर्शन मालिका विविध प्रकाराचे खेळ खेळणे या साठीही अडचणी येतात ३-४ नंबर पेक्षा जास्त नंबर असलेल्या व्यक्तींना लंगडयाला ज्याप्रमाणे कुबडी शिवाय चालता येत नाही त्याच प्रमाणे चष्म्याविना अपंगत्व आल्या प्रमाणे वाटते.या शिबीरात डॉ. प्रकाश कांकरिया ‘चष्मा नको’ असणा-या संबंधित रुग्णांनी शिबीरासाठी तपासणी पूर्व नांव नोंदणी करणे आवश्यक आहे. असे संपर्क अधिकारी आर टी. केदार यांनी कळविले आहे व इच्छुकांनी अधिक माहितीसाठी हेल्पलाईन मोबा ९११२२८८६११किंवा ८८८८९८२२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या