23.4 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeलातूरचित्रपट महोत्सवातून नवनिर्मात्यांना संधी

चित्रपट महोत्सवातून नवनिर्मात्यांना संधी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
एकेकाळी सिनेमा निर्मितीचे तंत्र हे श्रीमंतांची मक्तेदारी होती. अलीकडे हे तंत्र ग्रामीण भागातील कलात्मक विचारसरणीच्या लोकांपर्यंत पोहोचल्याचा परिणाम अनेक लघुपट निर्माण होत असून ते अतिशय दर्जेदार स्वरूपाचे आहेत, असे विचार बालाजी सुतार यांनी मांडले. येथील राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज लघुपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील होते तर प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उप प्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे हे होते.

पुढे बोलताना ते म्­हणाले की, चित्रपटातील जग हे वास्तविक जगापेक्षा भिन्न जगातील वाटायचे आणि त्यामुळे चित्रपटापासून आपण दूर राहिलेले बरे असे विचार मनात यायचे. कारण चित्रपटातील जग हे कल्पनेच्या पलीकडचे जग वाटत राहिले आहे, म्हणून ग्रामीण भागातील कलात्मक दृष्टिकोनाच्या लोकांनी अभिव्यक्तीसाठी लघु चित्रपट निर्मितीकडे वळावं, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. डॉ. गोपाळराव पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रास्ताविक लघुपट महोत्सवाचे संयोजक डॉ. दीपक वेदपाठक यांनी केले तर महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी स्वागत पर मनोगतात लघुपटामध्ये सामाजिक क्रांती घडवून आणण्याची ताकद असते असे विचार मांडले यावेळी वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेली दहा लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संभाजी पाटील यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या