26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeलातूरनुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाकडून आदेश

नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाकडून आदेश

एकमत ऑनलाईन

निलंगा (लक्ष्मण पाटील ): तालुक्यातील औराद शहाजानी येथे गुरुवारी ढगफुटीने झालेल्या शेतातील पिकाची , घरांची , तुंबलेल्या नाल्याची व दुकानाच्या नुकसानीची दि १८ सप्टेंबर रोजी तहसीलदार गणेश जाधव यांनी पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे सतत तीन दिवस मुसळदार पावसाने झोडपले . यातच दि १७ सप्टेंबर गुरुवार रोजी मेघगर्जनेसह ढगफुटी होऊन जोराचा पाऊस झाल्याने या अतिवृष्टीने शहरातील अनेकांच्या घरात , व्यापा-यांच्या दुकानात व शेतक-यांच्या शेतात पाणी घुसल्याने अतोनात नुकसान झाले आहे. सदर पावसाचा हाहाकार हा औरादसह तगरखेडा, हलागरा, सावरी, शेळगी, हालसी, माकणी, शिरशी , मसोबावाडी, सावनगीरा आदी तालुक्यातील गावामध्ये शेतातील सोयाबीन, उडीद, तूर, कारळ, भाजीपाला, ऊस, फळबागा याचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान या नुकसानीची तहसीलदार गणेश जाधव यांनी पाहणी करून कृषिविभाग, ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांना सदर नुकसानीचे पंचनामे करून सोमवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

यावेळी तहसीलदार जाधव यांनी पाणी दुकानात घुसून व्यापा-यांच्या झालेल्या नुकसानीचे, शहरातील तुंबलेल्या नाल्याचे, शेतक-यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे, घरात पाणी शिरून झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि त्यांनी संबंधित ग्रामविकास अधिका-यास गावातील तुंबलेल्या नाल्या तात्काळ काढून स्वच्छता व साफ सफाई करण्याचे आदेश दिले. तर राष्ट्रीय महामार्गातील दूतरफा नाल्याचे पाणी नदीपात्रापर्यंत पाण्याचा निचरा करण्याचे आदेश दिले. सदर अर्धवट नाल्या तात्काळ पूर्ण करण्याचे आदेशीत केले. तहसीलदार जाधव यांनी औराद येथील अभिनव कॉलनी येथील प्रा पेठकर यांच्या घरातील नुकसानीची व गोंिवद मरगणे यांच्या शेतातील नुकसान झालेल्या सोयाबीनची आणि तगरखेडा येथील रविराज माधवराव थेटे यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी सपोनी सुधीर सूर्यवंशी, मंडळ कृषी अधिकारी एच. एम. पाटील, ग्राम विकास अधिकारी धनाजी धनासुरे, तलाठी व्ही एस चव्हाण, कृषी सहाय्यक दीपक कलबोने, तलाठी विशाल कैंचे, कृषी पर्यवेक्षक जीवन लखने, मंंडळ अधिकारी कांबळे आदी उपस्थित होते.

स्मारकाच्या मुद्द्यावर राजकारण नको, सर्वांना सहभागी करून घेणार !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या