अहमदपूर : रत्नागिरी- नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील लातूर ते नांदेड या भागातील रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजून वाहतुकीसाठी रस्ता सुस्थितीत ठेवण्याचे लेखी आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सूनिल पाटील यांनी संबंधित कंत्राटदारास असल्याचे डॉ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले. लातूर ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गाच्या उभारणीचे काम मोठ्या जलद गतीने सुरुवात आहे. हा रस्ता ब-यापैकी पूर्णत्वास गेलेला आहे मात्र अनेक ठिकाणी वळण रस्ता, पुल बांधकाम, जागेचा प्रश्न, कांही तांत्रिक अडचण, रस्ता दुभाजक आदी कारणांमुळे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम ठिक ठिकाणी प्रलंबित आहे. सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे लातूर ते लोहा या भागात या रसत्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाहतुकीची अडचण येत आहे.
परिणामी दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. वहाने कसरत करून चालवावे लागत आहेत म्हणून लवकरात लवकर संबंधित रस्ता सुस्थितीत ठेवण्याबाबत डॉ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पत्र व्यवहार केला होता. याची तातडीने दखल घेऊन कर्तव्यदक्ष अधिकारी प्रकल्प संचालक सूनिल पाटील यांनी कंत्राटदारास लेखी आदेश दिले आहेत. हे आदेश प्राप्त होताच विशेषत: लातूर ते अहमदपूर व लोहा भागातील खड्डे बुजविण्यास सूरूवातही झाल्याचे सांगण्यात आले.