26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरलातुरात दोन दिवशीय परिसंवादाचे आयोजन

लातुरात दोन दिवशीय परिसंवादाचे आयोजन

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लातूरच्यावतीने बँंिकग क्षेत्रातील नवीन बदललेले कायदे त्याचा परिणाम, बँकेचा व्यवहार वाढीसाठीची टेक्नॉलॉजी व इतर विविध महत्त्वपूर्ण विषयावरती अत्यंत अभ्यासपूर्ण व अद्यावत नवीन मांडणी करणारे आर.बी.आय.चे निवृत्­त टे्रंिनग जनरल मॅनेजर के. सी. मिश्रा यांचे मार्गदर्शन दि. २८ व २९ मे रोजी सकाळी १०.३० वाजता स्वामी विवेकानंद पॉलिटेक्नीक कॉलेज एम.आय.डी.सी.कळंब रोड, लातूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे.

या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी एमएनएस बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून आर.बी.आय.चे निवृत्त ट्रेंिनग जनरल मॅनेजर के.सी.मिश्रा यांची उपस्थिती लाभणार आहे. या परिसंवादामध्ये केंद्र सरकारच्या ९७-अ घटनादूरूस्ती संदर्भात कोर्टाचा निर्णय व सध्यस्थीती, क्रेडीट ऍपरायजर, रिजर्व बँकेचे नागरी सहकारी बँकासंदर्भातील अद्यावत कायदे व बँक व्यवसाय वृध्दीसाठी अद्यायावत मार्केटींग सिस्टीम, एन.पी.ए.कर्ज वसुली संदर्भात कायदेशीर कार्यवाही, बँकेअंतर्गत व्यवस्थापन व अधिकार आदी विषयावर विचारमंथन होणार आहे. या परिसंवादाला बँकेचे संचालक व वरिष्ठ अधिकारी यांना निमंत्रीत करण्यात आलेले आहे. त्यामुळे एमएनएस बँकेच्या अधिकारी कर्मर्चा­यांनी या मार्गदर्शन शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन एम.एन.एस.बँकेचे कार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या