25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरओआरएस, झिंक हा जुलाब, उलटी वर प्रभावी उपचार

ओआरएस, झिंक हा जुलाब, उलटी वर प्रभावी उपचार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जुलाब, उलटीव्दारे शरीरातील पाणी व क्षार मोठया प्रमाणात बाहेर पडून अशक्तपणा वाढतो. अशा स्थितीत शरीरातील पाणी-क्षार यांची हानी भरून काढण्यासाठी मिठ, साखर, पाणी ही जलसंजीवनी अथवा ओआरएस आणि झिंक यांचे सेवन हा जुलाब, उलटीवर प्रभावी उपचार आहे. बाळास ओआरएस अथवा जलसंजीवनी पाजल्यास जुलाब, उलटी थांबते व मृत्यूपासून बचाव होतो, असे प्रतिपादन एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार यांनी केले. एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील बालरोग विभागाच्या वतीने जागतिक ओआरएस दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. एन. पी. जमादार बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. एच. मिश्रा, बालरोग विभाग प्रमुख डॉ. विद्या कांदे, बालरोग तज्ञ डॉ. महेश सोनार, डॉ. शिल्पा दडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दूषीत पाणी, अस्वक्षता आणि खेळताना अजानतेपणाने बाळाच्या पोटात जीवाणू व विषाणू प्रवेश करतात. त्यामुळे बाळास जुलाब, उलटी होऊन शारीरातील पाणी व क्षार बाहेर पडत असतात. अशा परिस्थितीत आजाराकडे दुर्लक्ष न करता बाळास स्वच्छ पाण्यात तात्काळ ओआरएसचे पावडर मिसळून पाजावे व डॉक्टरांच्या सल्ल्याने झिंकची गोळी द्यावी, असे सांगून डॉ. जमादार म्हणाले की, ओआरएस उपलब्ध होत नसल्यास घरातील मिठ, साखर व पाणी यांचे मिश्रण करुन ते बाळास पाजावे. हे उपचार बाळाला रुग्णालयात नेईपर्यंत द्यावेत. जेणेकरुन बाळाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहील. जुलाब, उलटी झाल्यास प्रौढ व्यक्तीही हा उपचार घेवू शकतात.

डॉ. मिश्रा म्हणाले की, जुलाब अथवा अन्या कारणाने अचानक शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने बालक दगावू शकते. त्यामुळे बाळास आवश्यक त्या प्रमाणात पाणी पाजावे व स्वच्छता राखून अन्न शिजवून द्यावे. डॉ. कांदे म्हणाल्या की, लहान मुलांना जंतुसंक्रमनामुळे जुलाब हा आजार होतो. जगभरात पाच वर्षाखालील मुलांचे जुलाबामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण हे दुस-या स्थानी आहे. मात्र लहान मुलांना जुलाब, उलटी झाल्यानंतर वेळेत जोडी नं. १ अर्थात ओआरएस व झिंक दिल्यास ९३ टक्के एवढया प्रमाणात बालमृत्यू टाळता येतात. डॉ. सोनार म्हणाले की, बाळाने दात काढल्यामुळे जुलाब होतो हा समज चुकीचा असून व्हायरस पोटात गेल्याने जुलाब होऊन शरीरातील पाणी कमी होते. अशावेळी ओआरएस दिल्यास बाळास सलाईन लावण्याची गरज भासणार नाही. त्यासोबत ंिझक दिल्यास पुढील अडीच तीन महिने जुलाबापासून संरक्षण होते. यावेळी डॉ. अखिलेश अंजान यांनी जागतिक ओआरएस दिनाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निखील नंदवाणी यांनी केले. तर आभार अभिषेक जैन यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शिल्पा दडगे, डॉ. सोनल रे, डॉ. व्यंकटेश माहुरे, डॉ. अपर्णा आस्था, डॉ. स्रेहल सोनकांबळे, डॉ. दिपीका माशाळकर, परिचारीका शाकिरा हिप्परगे, कविता येरमाळे, लिपीक किरण साबळे, सेवक सुग्रीव केंद्रे यांनी परिश्रम घेतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या