32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeलातूर...अन्यथा आणखी कठोर निर्णय

…अन्यथा आणखी कठोर निर्णय

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच राज्य शासनाच्या निर्देशानूसार लातूर जिल्ह्यात नव्याने नियम जारी करण्यात आले आहेत मात्र नागरिकांकडून ज्या प्रमाणात प्रतिसाद मिळायला हवा, तसा मिळत नाही. नागरिकांनी कोरोनाचे संकट गांभीर्याने घ्यावे. नियम पाळावेत अन्यथा आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशार जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिला आहे.

कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाची भूमिका कठोर आहे., असे नमुद करुन जिल्हाधिकारी पृथ्वीराज पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, कोणत्याही परिस्थिमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढणार नाहीत. जे रुग्ण आहेत त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत यासाठी लातूर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यामध्ये कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली पाहिजे. प्रशासन कठोर निर्णय घेण्याच्या मानसीकतेत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. कोरोना रोखण्यासाठी सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम, उत्सवावर बंदी घातली आहे.

मास्क लावणे सक्तीचे केले आहे. सॅनिटायझरचा वापर, शारिरीक अंतर ठेवणे आवश्यक आहे. राज्य सरकारे कोविड संदर्भात नवीन नियम जारी केले आहेत. त्यानूसार जिल्ह्यात रात्री संचारबंदी व दिवसा जमावबंदी आहे. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही काही भागात नागरिकांकडून याला प्रतिसाद मिळत नाही. जिल्हा प्रशासनाने आता कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सक्तीने सामोरे जाण्याचा निर्धार केला आहे.

नागरिकांनी कोविडचे नियम पाळावेत. जिल्हा प्रशासनावर कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका, महसूल, पोलीस, आरोग्य विभाग यासह प्रत्येक विभागावर जबाबदारी देण्यात आली आहे. नियमांचे काटेकोर पालन होत आहे की नाी, यासाठी संबंधीत विभाग काटेकोरपणे नियंत्रण ठेवणार आहे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज म्हणाले. या पत्रकार परिषदेस उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी पडदुणे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मणराव देशमुख यांची उपस्थिती होती.

रेमेडसिव्हीरसाठी उप जिल्हाधिक-यांशी संपर्क करा
जिल्ह्यामध्ये रेमेडसिव्हीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत अनेक अडचणी, तक्रारी आहेत. वात्वीक पाहता रेमेडसिव्हीरची अडचण येण्याचे काहींच कारण नाही. तरीही काही अडचण आल्यास उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक मोबाईल क्रमांक ९९२१९४४७६७ व जिल्हा पुरवठा अधिकारी पडदुणे मोबाईल क्रमांक ९८९०६१३९०७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी केले.

तीन दिवस पुरेल इतकाच लशींचा साठा
जिल्ह्यामध्ये लसीकरण मोठ्याप्रमाणात सुरु आहे. बुधवारपर्यंत १ लाख २९ हजारांहून अधिक लसीकरण करण्यात आले आहे. लसींचा पुरवठा कमी होत असल्याने आता तीन दिवस पुरेल इतकाच लशींचा साठा असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी नमुद केले. लसीची मागणी नोंदविली असून लवकरच लशीं उपलब्ध होतील, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्षमणराव देशमुख म्हणाले.

दहावी, बारावीच्या परिक्षा ऑनलाईन घ्याव्यात!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या