25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeलातूरजन्म होता घरात कन्येचा लेकीची ओवाळूया आरती...

जन्म होता घरात कन्येचा लेकीची ओवाळूया आरती…

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व सौ. सोनम श्रीकांत यांना ३० नोव्हेंबर रोजी कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल ३० मोठी झाडे लावून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुलीच्या जन्मानिमित्त झाडे लावून आनंदोत्सव साजरा करण्याची प्रत्यक्ष कृती ही कित्येकांना प्रेरणा देणारी आहे याबद्दल जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व सौ. सोनम श्रीकांत यांचे कौतुक होत आहे. एका मुलीच्या पाठीवर दुसरी मुलगी जन्माला आल्यानंतर साजरा केलेला हा आनंदोत्सव विशेष कौतुकास प्राप्त आहे. यानिमित्ताने बेटी बचाओ-बेटी पढावो हा संदेशही श्रीकांत दांपत्यांनी दिला. विचारानेच विचार बदलता येतात या हेतूने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी या अभिनव उपक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली आहे. राजीव गांधी चौक ते महात्मा बसवेश्वर चौक रस्ता दुभाजकात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी झाडे प्रायोजित करुन स्वत: झाडे लावली. यावेळी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष श्रीशैल उटगे, सुंदर पाटील कव्हेकर, ओमप्रकाश झुरळे उपस्थित होते.

हा उपक्रम यशस्वी करण्याकरीता ग्रीन लातूर वृक्ष टीमचे समन्वयक डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, गंगाधर पवार, अ‍ॅड. वैशाली यादव-लोंढे, सुलेखा कारेपुरकर, पुजा निचळे, स्वाती यादव, प्रफुल्ल पाटील, अ‍ॅड. सर्फराज पठाण, प्रमोद निपानीकर, ऋ षीकेश दरेकर, सुनिल नावाडे, मनमोहन डागा, सिया लड्डा, प्रसाद शिंदे, मोईज मिर्झा, अ‍ॅड. व्यंकटेश बेल्लाळे, महेश गेल्डा, सीताराम कंजे, डी. एम. पाटील, शिवशंकर सुफलकर, महेश भोकरे, संकेत कुलकर्णी, आनंद सुर्यवंशी, अरविंद फड, मंगेश शिंदे, गोविंद शिंदे, शैलेश सुर्यवंशी, खंडेराव गंगणे भुषण पाटील, सार्थक शिंदे, डॉ. अमृत पत्की, सुहास पाटील, प्रिया नाईक, सीमा धर्माधिकारी, वैभव डोळे, मुकेश ब्रिजवासी, सुरज पाटील, प्रमोद वरपे, बाळासाहेब बावणे, प्रितम साठे, विक्रांत भुमकर, पवन नावंदर, पृथ्वीराज पवार, विष्णु चव्हाण, कृष्णा वंजारी, विजयकुमार कठारे, नितीन पांचाळ यांनी परिश्रम घेतले.

आता तरी प्रतिमा सुधारेल?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या