लातूर : कोरोना विषाणुचा संसर्ग झालेल्या वाढत्या रुग्णंची ऑक्सिजनची गरज लक्षात घेता येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत १० हजार लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन लिक्विडच्या दोन टँकचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. हे काम पूर्ण होताच त्यातून येत्या दोन दिवसांत कोविड रुग्णांसाठी ऑक्जिन पुरवठा करण्यात येणार आहे.
येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकुण ३१० बेड्स कोविड रुग्णांसाठी आहेत. या ३१० बेड्सवरील कोविड रुग्णांना योग्य क्षमतेने ऑक्सिजन पूरवठा करण्याचा रुग्णालय प्रशासनाचा प्रयत्न आहे. परंतू, सध्या २६२ बेड्सवरील रुग्णांना ऑक्जिनचा पुरवठा होत आहे. ४८ बेड्सला कमी दाबाने ऑक्सिजन पुरवठा होत असल्याने या बेड्सवरील आरोग्य सेवा तात्पुरती थांबविण्यात आलेली आहे.
रुग्णालयात उपचारासाठी भरती असलेल्या कोविडच्या सर्व रुग्णांना योग्य क्षमतेने ऑक्सिजन पूरवठा करण्यासाठी रुग्णालयाची यंत्रणा कामाला लागली आहे. १० हजार लिटर क्षमतेचे दोन ऑक्सिजन लिक्विड टँक विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेस मंजूर झाले आहेत. त्याचे काम पूर्ण करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. येत्या दोन दिवसांत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होताच बंद असलेल्या ४८ बेड्सवरीलही आरोग्य सेवा पुर्ववत सुरु केली जाणार आहे.
लातूर जिल्ह्यातील कोविड रुग्णांना आरोग्य सेवा देणा-या विविध ३२ संस्थांमधून आजघडीला एकुण ४ हजार ६९० बेड्स आहेत. त्यापैकी २ हजार ३९३ रुग्ण भरती आहेत. २ हजार २९७ बेड्स शिल्लक आहेत. त्यात लातूर शहरातील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये ५६, फुलाबाई बनसोडे हॉस्पिल ४८, अल्फा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल २६, एमआयएमएसआर ४, लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ७५, लाईफ केअर हॉस्पिटल उदगीर ३२, सह्याद्री हॉस्पिटल लातूर २१, गॅलॅक्सि हॉस्पिटल लातूर २३, आयकॉन हॉस्पिटल लातूर ४१, गायत्री हॉस्पिटल लातूर ३०, असे बेड्स शिल्लक आहेत.
समाज जागृती आणी संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू