22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरसोयाबीनचे पंचनामे करून भरपाई द्यावी

सोयाबीनचे पंचनामे करून भरपाई द्यावी

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : सोयाबीन आले भारी पण त्याला फुल लागले नाही, असा प्रकार तालुक्यातील अजनी बु. शिवारातील सोयाबीन पिकाचा झाला असून प्रशासनाने याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतक-यांंनी निवेदनाद्वारे तहसीलदार अतुल जटाळे यांच्यासह कृषि अधिकारी व विमा कंपनीकडे केली आहे.

यावेळी माजी सभापती धोंडिराम सांगवे, शरद चिमेगावे, विकास चिमेगावे, ऋषीकेश चिमेगावे,सुंदरबाई शहाजीराव श्ािंदे, बंडू आदाटे आदी शेतकरी उपस्थित होते. तालुक्यातील अजनी बु. शिवारात सोयाबीन पिक चांगलेच बहरले आहे. फुल लागले नसल्याने फळ धारणाही होणार नाही. परिणामी पीक हातचे जाणार असल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे. दरम्यान या भागात सोयाबीन हे मुख्य पीक असल्याने शेतक-यांंची पुर्ण भीस्त ही सोयाबीनवरच अवलंबून आहे. हमखास उत्पादन देणारा व पैशाचे पीक म्हणून सोयाबीन कडे पाहिले जाते. यातूनच शेतकरी वर्षभर आपल्या कुटूंबाचे वार्षिक खर्च भागवितात. सदरील सोयाबीनचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या