24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरभाविकांना घडणार ‘पंढरपूरची वारी’

भाविकांना घडणार ‘पंढरपूरची वारी’

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
प्रत्येकाला जीवनात एकदा तरी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन व्हावे, अशी ईच्छा असते. पंरतु घरातील आर्थिक परिस्थितीमुळे भाविकांना ते शक्य होत नाही. पंरतु अशा शेकडो भाविकांना माजी नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या पुढाकारातून आजोबा व आजी यांच्या स्मरणार्थ प्रभाग १८ मध्ये ज्येष्ठ नागरिकांना पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घडविण्याचा संकल्प केला आहे. यंदाही १५ जून रोजी सकाळी ८ वाजता शहरातील चन्­नाबसवेश्­वर डी.फार्मसी कॉलेज माताजी नगर, कव्हा रोड येथून माता-पिता यात्रेची सूरुवात होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.गहिणीनाथ महाराज औसेकर हे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुधाकर श्रृंगारे, जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव पाटील कव्हेकर, सौ. प्रतिभाताई पाटील कव्हेकर, भाजपा प्रदेश कार्यकारीणीचे सदस्य शैलेश लाहोटी, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, शैलेश गोजमगुंडे, देविदास काळे, दीपक मठपती, मंगेश बिराजदार, भाग्यश्रीताई शेळके, सरिता राजगिरे, सुभाष सुलगुडले, जाफर पटेल, बालाजी शेळके, मनिष बंडेवार, शिरीष कुलकर्णी, प्रविण सावंत, दिग्वीजय काथवटे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रवि सुडे, संजय गिर, शोभाताई पाटील, विशाल हवा पाटील, सतीष ठाकूर, ललीत तोष्णिवाल, मिनाताई भोसले, देवा गडदे, विजय आवचारे, मुन्­ना हाश्मी, प्रताप शिंदे, परमेश्­वर महांडूळे, बालाजी गाडेकर, अजय पाटील, ऍड. गणेश गोजमगुंडे, शंभूराजे पवार, सागर घोडके, संतोष ठाकूर, राजेश पवार, गणेश श्रीमंगले, प्रेम मोहिते, काका चौगुले, रविशंकर लवटे, धनंजय आवस्कर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या