27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeलातूरमहावितरण कंपनीच्या क्षेत्रातील समांतर परवाना थांबवावा

महावितरण कंपनीच्या क्षेत्रातील समांतर परवाना थांबवावा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने दि. १६ डिसेंबर रोजी बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदने दिली. महाराष्ट्रातील काही शहरांच्या वीज पुरवठ्याची जबाबदारी खाजगी कंपन्यांकडे सोपवण्याच्या हालचाली शासनाकडून होत आहेत, हे प्रयत्न थांबवण्यात यावेत, अशी मागणी करणारे निवेदन महावितरण अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या वतीने आमदार अमित देशमुख यांना देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी अभियंता संघर्ष समिती शिष्टमंडळाने माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची भेट घेऊन राज्यातील ठाणे व नवी मुंबई परिसरातील महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील क्षेत्रात अदानी इलेक्ट्रिकल कंपनीला चालवायला देण्यासाठी समांतर परवाना न देणेबाबत निवेदन दिले. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्रातील जनतेचे हीत लक्षात घेता खाजगीकरणाचे सदरील प्रयत्न थांबवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन महावितरणच्या वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समिती शिष्टमंडळाला दिले. यावेळी यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे सरचिटणीस संजय खाडे, महावितरणचे कनिष्ठ अभियंता विष्णू अघाव, कनिष्ठ अभियंता ए. एन. दायमा, दासराव बिडगर, एकनाथ जाधव, सुनील कुकर, जी. बी. भाडुळे, राहुल भंडारी, सुदर्शन बोळेगावे, राम वाडकर, सचिन गुरव आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या