शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
शहरासह ग्रामीण भागातील अनेक युवकांना ‘लुडो’ गेमचे व्यसन जडले असून हॉटेल, पानटपरी, कट्यावर तसेच चक्क एखाद्या कार्यकृमात देखील आबालवृद्ध लुडो गेम सर्रासपणे खेळताना पहावयास मिळत आहेत. करमणुकीच्या या ऑनलाईन खेळात अनेकांचे आर्थिक नुकसान होत असून कामधंदा सोडून पाल्य लुडो खेळत बसत असल्याने पालकांसह समाज माध्यमातूनचिंता व्यक्त होत आहे.
आजच्या धावपळीच्या युगात मैदानी खेळ लुप्त पावत असतांना त्यातच करमणुकीचे साधन म्हणुन वापरले जाणारे स्मार्ट फोन मधील ‘लुडोकिंगश हे अॅप युवापिढीसाठी घातक ठरू लागले आहे.सुशीक्षीत बेरोजगार, नोकरदारासह, अबालवृध्द, विद्यार्थीही लुडो गेमच्या आहारी गेले आहेत. प्रारंभी चहा पानावर खेळला जाणारा हा खेळ पैशावर ही खेळतांना दिसत असल्याने हे लुडो गेम आबालवृद्धासाठी घातक ठरू लागले आहे. दरम्यान आजचे युग हे वज्ञिान व तंत्रज्ञानाचे युग असून त्यासाठी अँन्ड्राईड फोन आवश्यक बाब असली तरी तरूण वर्ग याचा सदुपयोग करण्याऐवजी ऑनलाईन खेळावर पैसा व वेळ उगाचच वाया घालवत आहेत.सध्या युवा पिढीतील जवळपास सर्वाकडे महागडे मोबाईल असून त्यात लुडो गेम आहे.
त्यात हा खेळ दोन ते चार जणांना एकाच मोबाईलवर खेळता येत असल्याने बेरोजगार युवक मिळेल त्या ठिकाणी लुडो गेम खेळत आहेत. युवा पिढीचे पाहून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी देखील या खेळाकडे आकर्षित होत असल्याने हा लुडो मोबाईल गेम घातक ठरत आहे. तो आता पैशावर खेळवला जात असून ंिजंकण्याच्या स्पर्धेमुळे युवापिढीचे नुकसान होत आहे. शहरांसह ग्रामीण भागातही तरूणासह लहान मुले अबालवृध्द व सुशीक्षीत युवक लुडो गेमच्या मोहात अडकले आहेत. तरूण मुले आपला काम धंदा सोडुन तासन् तास लुडो खेळत आहेत. सहज जमेल तिथे लुडो खेळताना तरुण दिसत असून त्यात रात्र ही घालवत असल्याने पालकचिंताग्रस्त झाले असून युवकांनी यात वाहत न जाता आपल्या शिक्षण व कामधंद्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.