औसा : आमदार अभिमन्यू पवार यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर प्लाझ्मा डोनेट करण्याचा संकल्प जाहीर केला होता . त्या संकल्पाची पूर्तता करीत त्यांनी व मुलगा परिक्षीत या दोघांनीही शुक्रवारी दि.२१ ऑगस्ट रोजी प्लाझ्मा डोनेट करीत लातूरचा मृत्यू दर देशात सर्वात कमी करण्याच्या या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन नागरिकांना आमदार अभिमन्यू पवार यांनी केले आहे.
शुक्रवारी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था येथील रक्तपेढी विभागात आमदार अभिमन्यू पवार व मुलगा परिक्षीत अभिमन्यू पवार यांनी प्लाझ्मा डोनेट केला.कोरोना ची चाचणी पॉझीटीव्ह आल्यानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर येथील शासकीय रुग्णालयातच उपचार घेण्याचा निर्णय घेत याठिकाणी पूर्ण उपचार घेऊन ते कोरोनामुक्त झाले होते. रूग्णालयात असतानाच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी खूप मनापासून सुश्रुषा केल्याची भावना व्यक्त करीत त्यांनी कोरोना मुक्त झाल्यानंतर प्लाझ्मा डोनेट करून कोरोना योद्ध्यांवरील दोन ते पाच गंभीर रुग्णांचा भार कमी करण्याचा निश्चय केला.
महाराष्ट्र आणि देशाच्या तुलनेत लातूर जिल्ह्याचा कोरोना मृत्यू दर अधिक असल्याची बाब ही बेचैन करीत असल्याने शहरात प्लाझ्मा डोनेशनची जनचळवळ उभी करण्यासाठी पुढाकार घेण्याचाही निर्धार आमदार अभिमन्यू पवार यांनी केला असून कोरोना मुक्त झालेल्या नागरिकांनाशी संपर्क साधून प्लाझ्मा डोनेट करण्याचे आवाहन करणार आहे. यातून नक्कीच अजून काही जण पुढे येतील असा विश्वास व्यक्त करून कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी प्लाझ्मा डोनेट करून लातूरचा मृत्यू दर देशात सर्वात कमी करण्याच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे भावनिक आवाहन आमदार पवार यांनी केले आहे.
प्लाझ्मा डोनेट केल्यानंतर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, वैद्यकीय अधीष्ठाता डॉ. मोहन डोईबळे, उपअधिष्ठाता डॉ. उदय मोहिते,वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे,डॉ. संजय जगताप,डॉ. मारुती कराळे, डॉ. उमेश कानडे,डॉ. शैलेश चव्हाण,डॉ. सुरेश चौरे,डॉ.दळवे,अमृता पोहरे, समाजसेवा अधीक्षक सुरेंद्र सुर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून आमदार अभिमन्यू पवार व मुलगा परिक्षीत यांचे अभिनंदन केले.
बुकनवाडीत तरूणाचा खून,०६ जणांच्या विरोधात गुन्हा