22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरविज्ञान रांगोळी स्पर्धेत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

विज्ञान रांगोळी स्पर्धेत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
गणेशोत्सवानिमित्त येथील श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात शाळेतील विज्ञान मंडळाच्या वतीने विज्ञान रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत आठवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून केशवराज विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी डॉ. राधिका पाठक व विज्ञान विषय शिक्षिका मोहिनी सुरवसे यांनी काम पाहिले. परीक्षक म्हणून मनोगत व्यक्त करताना डॉ. पाठक म्हणाल्या की, आधुनिक विज्ञान व आयुर्वेद यांचा संगम करुन जीवन जगले तर आपण आरोग्यवान बनू शकतो. विज्ञानाला कलेची जोड दिली तर विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची गोडी निर्माण होईल, हे ओळखूनच केशवराज माध्यमिक विद्यालयातील विज्ञान मंडळाने विज्ञान रांगोळी स्पर्धा आयोजित केली आहे.

या शाळेत असताना मी जिथे रांगोळी काढली तिथेच रांगोळी स्पर्धेची परीक्षक म्हणून मला आज बोलावले हा योग माझ्यासाठी खूप आनंदाचा योग आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. स्पर्धेचा समारोप करताना पर्यवेक्षक संदीप देशमुख म्हणाले की, अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे व त्यात सहभाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांची विज्ञान विषयाची गोडी वाढते.विज्ञान विषयाच्या अभ्यासातही वाढ होते. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुनील वसमतकर यांचे मार्गदर्शन आणि उपमुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे, पर्यवेक्षक संदीप देशमुख, बबन गायकवाड, गणेशोत्सव प्रमुख श्रीमती सारिका चद्दे, अभ्यास पूरक मंडळ प्रमुख श्रीमती शैलजा देशमुख यांचे सहकार्य लाभले. स्पर्धा प्रमुख श्याम अंदूरे व सर्व विज्ञान शिक्षकांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इंदू ठाकूर यांनी केले. विज्ञान मंडळ प्रमुख श्रीमती अनुपमा पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या