28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरयुवक बिरादरीच्या ताज मीट कार्यशाळेमध्ये ‘दयानंद कला’चा सहभाग

युवक बिरादरीच्या ताज मीट कार्यशाळेमध्ये ‘दयानंद कला’चा सहभाग

एकमत ऑनलाईन

लातूर : आग्रा येथे युवक बिरादरी भारतद्वारे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा ताज मीट येथे युवकांना आग्रा महानगरपालिकेचे आयुक्त निखिल फुंडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, दिल्ली आणि देशाच्या विविध भागातील १०० युवक सहभागी झाले होते. त्यात येथील दयानंद कला महाविद्यालयाचाही सहभाग होता.

दयानंद कला महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश पवार या विद्यार्थीने आग्रा येथे युवक बिरादरी भारत द्वारे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा ताज मीट २०२२ येथे सहभागी झाला. या विद्यार्थ्यांला सन्मानपत्र देण्यात आले आणि या राष्ट्रीय स्तरावर सामाजिक जबाबदारीचे संस्कार, व्यक्तिमत्व विकास व नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी युवक बिरादरी (भारत) द्वारे ग्रैंड हॉटेल आग्रा येथे ही युवकांची कार्यशाळा झाल.ी. युवक बिरादरीच्या विश्वस्त स्वर क्रांती यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान महाविद्यालयीन जीवन, आवडत्या गोष्टी आवडती पुस्तके, लेखक-कवी त्याबद्दल विद्यार्थ्यांचे मत घेण्यात आले आणि यासोबतच युवाभूषण, गटचर्चा, वैयक्तिक मुलाखत, अभिरूप युवा संसद, एक सूर एक ताल, हरित वसुंधरा आदी कार्यक्रमांची तयारीही तरुणांना करून देण्यात आली. हॉटेल ग्रँड, आग्रा येथे व्यक्तिमत्व विकास आणि नेतृत्व विकासासाठी आयोजित या शिबिरात देशातील तज्ज्ञांनी राजकारण, प्रशासन, पर्यावरण, नवोपक्रम आणि उद्योजकता या विषयांवर आपली मते मांडली आणि विद्यार्थ्यांना खूप काही शिकण्यास मिळाले.

सदर कार्यशाळेस दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने आर्थीक मदत केली आहे. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई शहा, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, संयुक्तसचिव सुरेश जैन व कोषाध्यक्ष संजय बोरा आदींनी कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. सुभाष कदम, डॉ. सुनिता सांगोले, डॉ. मंिच्छद्र खंडागळे, डॉ. संतोष पाटील आदींनी सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या