21.9 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeलातूरहमीभाव, क्रॉप पॅटर्नसाठी केंद्राच्या समितीत पाशा पटेल

हमीभाव, क्रॉप पॅटर्नसाठी केंद्राच्या समितीत पाशा पटेल

एकमत ऑनलाईन

लातूर : हमीभाव, क्रॉप पॅटर्नसाठी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत केंद्र आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी, शेतकरी, कृषी वैज्ञानिक, कृषी अर्थ तज्ञ, राष्ट्रीय कृषी पुरस्कार विजेते आदी १६ मान्यवरांची एक समिती स्थापन केली असून, त्यात शेतकरी प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष तथा पर्यावरण अभ्यासक, बांबू लागवड चळवळीचे प्रणेते पाशा पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे. शेतक-यांचे उत्पन्न वाढावे यादृष्टीने सदर समिती घटित करण्यात आली आहे. हमीभाव अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी ही समिती काम करणार आहे.

माजी कृषी सचिव संजय अग्रवाल यांना या समितीचे अध्यक्ष असून, सदस्य म्हणून नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद, कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉ. सी. एस. सी. शेखर (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिकडेव्हलपमेंट), डॉ. सुखपाल सिंग (आयआयएम अहमदाबाद), राष्ट्रीय पुरस्कार विजेते शेतकरी भारतभूषण त्यागी, शेतकरी सहकार, गटाचे प्रतिनिधी दिलीप संघानी (अध्यक्ष इफको) विनोद आनंद, कृषी विद्यापीठ, संस्थेचे वरिष्ठ सदस्य डॉ. पी. चंद्रशेखर (महासंचालक, राष्ट्रीय कृषी विस्तार संस्था (व्यवस्थापन), डॉ. जे. पी. शर्मा (कुलगुरु, शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, जम्मू) आधी महान व्यक्तिमत्त्वांचा शेतकरी प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रातून पाशा पटेल यांचा यांचा समावेश करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वीच पाशा पटेल यांचा केंद्र सरकारच्या व्यापार मंडळावर समावेश करण्यात आला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या