36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeलातूरलक्षणे सौम्य असल्याने रुग्णांकडून गृहविलगीकरणास प्राधान्य

लक्षणे सौम्य असल्याने रुग्णांकडून गृहविलगीकरणास प्राधान्य

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने जिल्हाभरात कोविड सेंटर्स सज्ज ठेवले आहेत. सध्या कोरोना विषाणु तीव्र नसल्याने पॉझिटिव्ह रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज भासत नसल्याचे दिसून येत आहे. बहुतांश कोरोनाबाधित रुग्णांना लक्षणे सौम्य असल्याने रुग्ण गृहविलगीकरणाच्या पर्यायाला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहेत. आजघडीला गृहविलगीकरणात … रुग्ण उपचार घेत आहेत.

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यात कोविड सेंटर्स सज्ज ठेवली आहेत. लातूर शहरातील १२ नंबर पाटी येथील समाज कल्याणचे वसतिगृह, औसा रोडवरील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतचे वसतिगृह, शासकीय सर्वोपचार रुग्णालय, चाकुर, शिवणी, निलंगा येथे प्रत्येकी एक, उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात कोविड सेंटर सज्ज ठेवले आहे. या कोविड सेंटर्समध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटरही उपलब्ध आहेत. अद्यापतरी रुग्णांना कोविड सेंटरची गरज भासत नाही. बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने गृहविलगीकरणाचा पर्याय निवडला जात आहे. त्यामुळे कोविड सेंटर्सवर रुग्णांची गर्दी होताना दिसत नाही. असे असले तरी सर्व प्रकारची तयारी आरोग्य यंत्रणेने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनूसार करुन ठेवली आहे.

लातूर जिल्ह्यात सध्या तरी ओमिक्रॉनचा उद्रेक दिसून येत नाही. दुब ईहून आलेला फक्त एक रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यावर उपचार करुन तो निगेटिव्ह आल्यानंतर त्यास घरी सोडण्यात आले. सद्यस्थितीत विदेशातून आलेल्या एका रुग्णाचा नमुना ओमिक्रॉनबाधित आहे का, हे पाहण्यासाठी पुण्याच्या प्रयोगशाळेस पाठविण्यात आलेला आहे. त्याचा अहवाल अद्याप आरोग्य यंत्रणेस प्राप्त झालेला नाही. सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सौम्य लक्षणे असून एकही तीव्र लक्षणे असलेला रुग्ण चाचण्यांमधून समोर येत नाही. सध्या थंडी व ढगाळ हवामान कोरोना विषाणुला पोषक ठरत आहे. त्यामुळे काही अंशी रुग्णवाढ दिसून येत आहे. हवामान स्वच्छ राहिल्यास दररोजची आढळणारी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल. परंतू, सध्या वातावरण साथ देत नसल्याने रुग्णवाढ होत आहे. तरीसुद्धा आरोग्य यंत्रणेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवून कोविड सेंटर्स कार्यान्वित करुन ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध केले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या