शिरूर अनंतपाळ : सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख, प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रकाशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील बाकली येथील विकास विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध निघाली असून सोसायटीच्या चेअरमनपदी प्रकाश पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी देवानंद जाधव यांची सर्व संचालकांच्या उपस्थितीत सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या प्रसंगी जेष्ठ नेते संग्राम घारोळे,रावसाहेब शिंदे, दिलीपराव शिंदे,सुरेश पाटील,उमाकांत शिंदे, सरपंच नागनाथ हारगे ,उपसरपंच हंसराज पाटील, शरद साळुंके, संजय चत्तिे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तालुक्यातील बाकली येथील विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन प्रकाशदादा पाटील यांच्या कार्यकाळात सोसायटीच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षापासून शेतकरी हिताची कामे केल्याने सर्व सभासदांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत सलग सातव्यांदा सोसायटी बिनविरोध निवड काढली असून प्रकाशदादा पाटील यांची चेअरमनपदी निवड केली आहे. यात त्यांची दुसरी पिढी
उपसपंच हंसराज पाटील व दत्ता पाटील ही राजकारणात सक्रीय झाले असून ग्रामस्थांतून त्यांना पांिठबा मिळत आहे. या प्रसंगी निवडणुक अधिकारी धोंडगे, सोसायटी सचिव उमेश राऊत यांसह नूतन संचालक अब्दुलसाब शेख, राजपाल पाटील, परमेश्वर घारोळे, व्यंकट बालुरे, व्यंकट पाटील, नानासाहेब शिंदे, सविता गजभार,सुमनबाई बसपुरे, माधव हारगे, मंगेश साकोळे, रामचिंचोले उपस्थित होते.येणा-या काळात सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी हिताची कामे करणार असल्याचे चेअरमन प्रकाश पाटील यांनी सांगितले. या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.