24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरपाटील यांनी केली जिल्हा परिषद शाळेची साफसफाई

पाटील यांनी केली जिल्हा परिषद शाळेची साफसफाई

एकमत ऑनलाईन

चाकूर : शहरातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी लहान चिमुकले जातात.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव १५ ऑगस्टला उत्साहाने साजरा होणार आहे. परिसर स्वच्छ राहावे म्हणून साफसफाईचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.मैदानावर चारीही बाजूंनी गाजर गवत आल्यामुळे मैदांनावरुन चालत जाणेही बनले आहे. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विलाराव पाटील यांनी मैदांनावरील गाजर गवत आणि झुडुपे काढण्यासाठी स्वखर्चातून सुरुवात केली आहे.

सध्या समाजामध्ये प्रत्येक जण स्वत:साठी जगतो. परिवारासाठी जगतो पण काँगे्रसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील यांनी गेल्या वर्षीपासून दरवर्षी जिल्हा परिषद शाळेची स्वच्छता करण्यासाठी स्वत:चे पैसे घालून स्वच्छता करीत असतात. चाकूर जिल्हा परिषद शाळेच्या मैदांनावर चिमुखल्याना खेळण्यासाठी मैदानांची साफसफाई करण्यात येत आहे. घाणीचे साम्राज्य सध्या शाळेच्या आवारात दिसून येत आहे. पावसाळ्यात लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही. याची खबरदारी घेऊन शाळेच्या मैदांनाची सफाई सुरू आहे. जिल्हा परिषद शाळेतील खोल्यांची पावसामुळे गळती होऊन खोल्यात पाणी साठत आहे.शाळेची बिकट परिस्थिती पावसामुळे झाली आहे. जिल्हा परिषद शाळा स्थापन होऊन शंभर वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या