23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरयेलोरी सोसायटीवर पुन्हा पाटील पॅनल बिनविरोध

येलोरी सोसायटीवर पुन्हा पाटील पॅनल बिनविरोध

एकमत ऑनलाईन

औसा : औसा तालुक्यातील येलोरी येथील विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक चेअरमन दिलीप चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निघाली आहे. या सोसायटी अंतर्गत येलोरी, येलोरी वाडी, ंिरगणी या तीन गावांचा समावेश आहे. दि ९ मे २०२२ रोजी चेअरमन म्हणून चंद्रकांत शिवदर्शन पाटील व व्हाईस चेअरमन म्हणून विजयकुमार सर्जे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मसलगे पी व्ही यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली व चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या वीस वर्षांपासून ही संस्था दिलीप पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आहे. दिलीप पाटील यांच्या कारकर्र्र्दीत सोसायटीची उलाढाल ५० लाखांपासून ते आता ५ कोटीच्या घरात आलेली आहे. तो विश्वास कायम ठेवत सोसायटी बिनविरोध काढण्याचे काम केले आहे.

या प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने मसलगे पी. व्ही. यांचा दिलीप पाटील यांनी शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार केला. तसेच गटसचिव टी. डी. बनकर, सूर्यवंशी पी जी, येल्लोरीचे गटसचिव अरुण नरखेडकर यांचाही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व नूतन संचालक शिवानंद मुळे, कमलाकर ंिरगणकर, राजेंद्र येरटे, सिद्धेश्वर बिराजदार,देवराज पाटील, आत्माराम बोचरे, नामदेव सगरे, गंगाराम गुंजिटे, विष्णू सर्जे, सौ. कारभारी प्रिया, सौ. कुलकर्णी अनघा व सेवक शिवा गायकवाड यांचाही ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोसायटीचे सभासद अ‍ॅड. संजय कुलकर्णी, हनुमंत बिराजदार, विश्वनाथ कोरे, अमृत बिराजदार, बी. ए. पाटील, केशव मुळे, रुद्राप्पा बिराजदार, विलास बर्दापूरे, शंकर पाटील, विशाल पाटील, किसन येरटे, मुरली गायकवाड, रामा सगरे, बाळू बिराजदार, शिवा उबाळे, शिवानंद कोरे, मनमथ येरटे, मनमथ निटुरे, चांद मुलाणी, रुद्रप्पा येरटे आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. सोसायटी बिनविरोध काढण्यासाठी तीन्ही गावातील सभासदांनी परिश्रम घेतले. याबद्दल दिलीप पाटील यांनी सर्व सभासदांचे आभार मानले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या