22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरमहात्मा बसवेश्वरमध्ये देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा

महात्मा बसवेश्वरमध्ये देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय (अमृत महोत्सव समिती व संगीत आणि सांस्कृतिक विभाग), लातूर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि लातूर जिल्हा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूह गायन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.

या स्पर्धेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, उपकेंद्र, लातूर येथील संचालक डॉ. राजेश शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर हे होते. तर विचारमंच्यावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रमाकांत घाडगे, डॉ. राजेंद्र अवस्थी, डॉ. संदीपान जगदाळे, प्रा. गोविंद घार, डॉ. दीपक चाटे, डॉ. संतराम मुंढे, डॉ. रमेश धनेश्वर, डॉ. अंजली जोशी, डॉ. केशव अनगुले, डॉ. भास्कर रेड्डी, भुजंग
मुर्के, डॉ. दीपाली पांडे, डॉ. परांडे, प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, डॉ. श्रीकांत गायकवाड, डॉ. बाळासाहेब गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटन प्रसंगी डॉ. शिंदे म्हणाले की, आपण यावर्षी आझादीका अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. भारतीय स्वातंत्र्य लढयामध्ये सहभागी झालेल्या शहिदांना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिवादन करीत आहोत. प्राचार्य डॉ. डोंगरगे म्हणाले की, मानवी जिवनामध्ये संगीताला अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या महाविद्यालयात प्रा. विजयकुमार धायगुडे, प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. गोविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत विभाग नेत्रदीपक प्रगती साध्य करीत आहे. तसेच मागील वर्षी आपल्याला विविध क्षेत्रामध्ये ९ गोल्ड मेडल मिळाले आहेत.

यावेळी डॉ. राजेंद्र अवस्थी, प्रा. गोविंद घार, डॉ. रमाकांत घाडगे, डॉ. श्रीकांत गायकवाड आदिनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर डॉ.संदीपान जगदाळे यांनी स्पर्धेचे नियम व अटी सर्वाना सांगितल्या. अध्यक्षीय समारोपात टाकळीकर म्हणाले की, महात्मा बसवेश्वर यांच्या पावन विचारांची ही भूमी आहे. संगीत सर्वाना संस्कार देण्याचे महत्वाचे कार्य करते. आपन पदाधिकारी म्हणून काम न करता सेवक म्हणून कार्य केले पाहिजे असे सांगून आपली वैयक्तिक संपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती मानले पाहिजे असेही ते म्हणाले.

या स्पर्धेमध्ये महात्मा बसवेश्वर वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय संघाला प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी ३ हजार रूपयांचे पारितोषिक, तर दयानंद वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय संघाला द्वितीय क्रमांकाचे प्रत्येकी २ हजार रुपयांचे पारितोषिक आणि राजर्षी शाहू वरिष्ठ महाविद्यालय संघाला तृतीय क्रमांकाचे १ हजार रुपयांचे पारितोषिक आणि सहभागी प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्या संघास विद्यापीठस्तरीय स्पर्धेत सहभागी होता येईल. या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून सुरमणी भुजंग मुर्के, डॉ. दीपाली पांडे आणि डॉ. परांडे यांनी काम पहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धोंडीबा भुरे आणि डॉ. अश्विनी रोडे यांनी तर आभार डॉ. रत्नाकर बेडगे यांनी
मानले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या