24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरलातूर शहरातील फुटपाथ होणार खुले

लातूर शहरातील फुटपाथ होणार खुले

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
शहरात दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत आहेत. त्यामुळे स्वच्छ, सुंदर, हरित शहराला बकाल स्वरुप येत आहे. ही बाब लक्षात घेता लातूर शहर महानगरपालिकेने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. शहरातील सर्वच फुटपाथवरील अतिक्रम काढण्यास प्राधान्य दिले जात असल्याने फुटपाथ खुले होणार आहेत. त्यामुळे पायी चालणा-यांना शहरातून सुरक्षीतपणे ये-जा करता येणार आहे. फुटपाथवरील अतिक्रमण व इतर अतिक्रमण संबंधीतांनी काढून घ्यावेत अन्यथा संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश आयुक्त अमन मित्तल यांनी दिले आहेत.

शहरातील गंजगोलाई या मुख्य बाजारपेठेसह विविध भागांमध्ये अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. विशेषत: फुटपाथवर अनेक छोटे-मोठे अतिक्रमण व्यापा-यांनी केले आहेत. फुटपाथवर अतिक्रमण करुन अनेक व्यवसाय थाटलेले आहेत. त्यामुळे फुटपाथचा वापर चालण्यासाठी न होता व्यापारासाठीच होत आहे. परिणामी पायी चालणा-यांना वाहनांच्या गर्दीतून जीव धोक्यात घालून चालावे लागते. बहुतांशवेळा पादचा-यांना अपघातालाही सामोरे जावे लागले आहेत. ही बाब लक्षात घेता लातूर शहर महानगरपालिकेने शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणासह इतर अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरु केली आहे. अतिक्रमणामुळे शहरातील वाहतुकीचाही प्रश्न गंभीर होत चालला आहे. ही बाब लक्षात घेता शहरातील अतिक्रमणे काढण्यात यावीत, अशी वारंवार मागणी होत होती. महापालिका आयुक्तांनी दि. १४ सप्टेंबर रोजी शहरातील अतिक्रमणे काढण्याबाबत आदेश काढला आणि अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू झाली.

शहरातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश आयुक्तांनी देताच बुधवारी गंजगोलाईतील अतिक्रमणे काढण्यात आली. रस्त्यावर मारलेल्या पिवळ्या पट्टीच्या बाहेर असलेल्या हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. नियम मोडणा-यांचे हातगाडे ताब्यात घेण्यात आले. हातगाडीवाल्यांनी रस्त्यावरील पिवळ्या पट्टीच्या आत उभे राहून आपला व्यवसाय करावा, अशी सूचना देण्यात आली. गुरुवारी अगदी सकाळी महात्मा गांधी चौकातील फुटपाथवरील अतिक्रमणे काढण्यात आली. फुटपाथवरील छत्र्या, कमानी, रॅम्प, टेबल, खुर्च्या जप्त करुन फुटपाथ खुला करण्यात आला. मेन रोडवरील काँग्रेस भवन परिसरातील दुकाने काढण्यात आली. फुटपाथवरील कपड्यांची दुकाने हटविण्यात आली. महात्मा गांधी चौक ते हनुमान चौक आणि हनुमान चौक ते गंजगोलाई या मुख्य रस्त्यावरी फुटपाथवरील अतिक्रमणे काढून फुटपाथ मोकळा करण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या