लातूर : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाच्या घराचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून बंद केला जातो. या परिसरात केल्या जाणाºया उपाययोजना संदर्भात पाहणी करुनच देयके अदा केली जाणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबात तसेच त्या घराच्या परिसरात संसर्ग वाढू नये यासाठी महापालिका कंटेनमेंट झोन करते. अनेक ठिकाणी कंटेनमेंट झोन आवश्यकतेनुसार निश्चित करण्यात येतात. काही ठिकाणी छोटे कंटेनमेंट झोन आहेत. एखादे अपार्टमेंट सील करण्यासाठी कमी साहित्य लागते किंवा काही ठिकाणी फक्त बांबू लावण्यात आलेले आहेत. अशा ठिकाणची व्यवस्था पाहूनच त्याची देयके दिली जाणार आहेत.
या संदर्भात कार्यालयीन लेखापरिक्षण झाल्यानंतरच देयके अदा करावीत, असे आदेश महापौरांनी दिलेले आहेत. छोट्या कंटेनमेंट झोनसाठी ८ हजार रुपयांप्रमाणे देयके देण्यात आलेली नाहीत. प्रत्येक कंटेनमेंट झोनची माहिती प्रशासनाच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे. त्यासाठी स्वतंत्र रजिस्टर तयार करण्यात आलेले असून छायाचित्रेही काढण्यात आलेली आहेत.कंटेनमेंट झोनच्या कामात कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही आणि अधिक रकमेची देयके दिली जाणार नाहीत, याची खबरदारी महापालिका प्रशासनाच्या वतीने घेतली जात असल्याचे आयुक्त देविदास टेकाळे यांनी सांगितले.
Read More शिवसेनेतर्फे आत्मनिर्भर योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ