लातूर : प्रतिनिधी
पीसीआरए यांच्या वतीने ऊर्जा आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर या विषयांवरती डोमेस्टिक वर्कशॉप आयोजित करण्यात आला. या वर्कशॉपचा समारो झाला. अध्यक्षस्थांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड हे होते. इंधन बचतीसाठी ऊर्जा ऑडिटर केदार खमितकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी ईंधन संरक्षण की जिम्मेदारी, जनगण की भागीदारी घरगुती गॅसचा अतिरिक्त वापर टाळा, इंधन वाचवा आणि बचत वाढवा असा संदेश दिला, कोळसा, तेल, वायू, इंधन लाकूड इत्यादी जाळल्यामुळे वातावरणातील प्रदूषण वाढते त्यात कार्बन ऑक्साईड्स, सल्फर, नायट्रोजन व इतर हानिकारक पदार्थांचा समावेश आहे, असे प्रतिपादन खामितकर यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अनिल माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, नवनाथ भालेराव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विलास कोमटवार, प्रा. सुरेश क्षीरसागर, प्रा. गोपाल बाहेती प्रा. शैलेश सूर्यवंशी प्रा. संदीप जगदाळे आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थींनीनी सहभाग नोंदवला.
यावेळी पर्यायी अपारंपरिक ऊर्जा- सौर ऊर्जा कुकर या विषयावरती डाक्यूमेंट्री फिल्म दाखविण्यात आले. इंधन वाचवण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे जेव्हा खरोखरंच गरज असेल, तेव्हा गाडी चालवणं. अन्यथा चालतकिंवा सायकलवर जाण्याचा पर्याय निवडणंचयोग्य ठरेल असे कार्यक्रमात सांगण्यात आले. यावेळी प्रत्येक सहभागीना ऊर्जा बचतीची मार्गदर्शक पुस्तिका मोफत प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रीय इंधन संरक्षण प्रतिज्ञेने करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रा. दिनेश जोशी यांनी केले.