28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरऔराद शहाजानीत शांतता बैठकीस पोलिसांचीच दांडी

औराद शहाजानीत शांतता बैठकीस पोलिसांचीच दांडी

एकमत ऑनलाईन

निलंगा : गणपती व गौरी सणाच्या पार्श्वभूमीवर निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील पोलीस प्रशासनाने नुकतेच आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीस बहुतांश पोलीस कर्मचा-यांनी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत दांडी मारली आहे मात्र बैठकीस तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, गणेश भक्त, पदाधिकारी व प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील पोलिस ठाणे अंतर्गत एकंदरीत ३२ गावे ४ वाड्या म्हणजे ३६ गावांचे कार्यक्षेत्र आहे. तसेच १ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असे २ अधिकारी व ३० पोलीस कर्मचारी तैनात आहेत. तसेच अतिरिक्त ३० होमगार्ड ही गणेशोत्सव व गौरी सणाच्या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आले आहेत. या सणासुदीच्या पाश्र्­वभूमीवर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक कामत यांनीही दि २८ ऑगस्ट रोजी ३६ गावांतील गणेश भक्त, गणेश मंडळाचे पदाधिकारी,पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, प्रतिष्ठीत नागरिक व गाव पुढारी यांच्यासह पोलिस कर्मचा-यांना समितीच्या बैठकीसाठी आमंत्रित केले होते मात्र बहुतांश पोलीस कर्मचारीच या शांतता कमिटीच्या बैठकीस हजर राहण्याचे आदेश असतानाही दांडी मारून गैरहजर असल्याने औराद शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. यावर सपोनि संदीप कामत काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विशेष म्हणजे या शांतता कमिटीच्या बैठकीस सर्व गावातील निमंत्रित उपस्थित होते मात्र अनेक पोलीस कर्मचारी अनुपस्थित असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

जुगार खेळल्यास गुन्हे दाखल होतील : कामत
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ईकोफ्रेंडली फटाके वाजवावे, स्पीकर्स आवाज ६५ डीसेबलपर्यंत असावे, दररोज गणेश मंडळांचे दोन कार्यकर्ते मुर्तीजवळ राहुन गार्ड म्हणून काळजी घ्यावी, गाड्या अडवून वर्गणी मागण्याचे प्रकार करू नये, पत्ते चिठ्या जुगार खेळु नये अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील. गणपतीचा सण म्हणजे पैसे मिळविण्याचे साधन नव्हे, असे आवाहन सपोनि संदीप कामत यांनी केले. बैठकीनंतर मिरवणूक मार्गावर पथसंचलन करण्यात आले. या प्रसंगी २२ पोलीस कर्मचारी उपस्थित होते असे सपोनि संदीप कामत यांनी एकमतशी बोलताना सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या