26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeलातूरहिंगोलीत स्वागत समारंभास लातूर जिल्ह्यातील जनतेने सहभागी व्हावे

हिंगोलीत स्वागत समारंभास लातूर जिल्ह्यातील जनतेने सहभागी व्हावे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारीपासून निघालेली ‘भारत जोडो यात्रा’ ७ नोव्हेंबर रोजी तेलंगणा राज्यातून महाराष्ट्र राज्यात देगलूर येथे प्रवेश करणार आहे. या यात्रेचे ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता हिंगोली जिल्ह्यातील हिवरे, चोरांबा फाटा येथे लातूर जिल्ह्यातील जनतेच्या वतीने स्वागत करण्यात करण्यात येणार आहे. यावेळी लातूर जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची भावना वाढीस लागून देशाची एकात्मता अधिक मजबूत व्हावी म्हणून काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेस प्रारंभ झाला आहे, विविधतेतून एकता साधणा-या या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी देशभरातून ३७५० किलोमीटरचा पायी प्रवास करणार आहेत, दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यात या यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून लाखोच्या संख्येने विविध स्तरातील नागरिक यात्रेत सहभागी होत आहेत. ७ नोव्हेंबर रोजी ही भारत जोडो यात्रा तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रवेश करणार आहे, नांदेड जिल्ह्यातील चार दिवसाच्या प्रवासानंतर ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता सदरील यात्रा हिंगोली जिल्ह्यात हिवरे, चोरांबा फाटा येथे प्रवेश करणार आहे.

लातूर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी भव्य स्वागत करण्यात येणार आहे, लातूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व जनतेने या ठिकाणी भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित राहून पुढे यात्रेत सहभागी व्हायचे आहे, हिंगोली जिल्ह्यात या यात्रेचा चार दिवसाचा प्रवास असून पुढे वाशिम जिल्ह्यात ही यात्रा प्रवेश करेल,
पुढे अकोला, बुलढाणा जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करील. महाराष्ट्रात नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात ७ ते २० नोव्हेंबर अशा १४ दिवसात एकूण ३८२ किलोमीटर ही यात्रा प्रवास करणार आहे. या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील जनतेने जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहनही आमदार अमित देशमुख यांनी केले आहे.

काँग्रेस भवनात नाव नोंदणीची सोय
ज्या नागरिकांना या भारत जोडो यात्रेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी, लातूर काँग्रेस भवन येथे आपल्या नावाची नोंदणी करावी, त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यात्रेत सहभागी होणा-या नागरिकांना योग्य प्रकारची माहिती द्यावी, त्यांना आवश्क त्या सर्व प्रकारचे सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार देशमुख यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या